Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महिला व बालकल्याण विभागाचे सखी अभियान

Date:

मुली वयात येत असताना वयाच्या विशिष्ट टप्प्यावर स्त्री धर्मानुसार मुर्लीना मासिक पाळी येते. या शारीरिक बदलामुळे मुली अबोल व अस्वस्थ होतात. मासिक पाळीच्या कालावधीमध्ये मुलींचा दृष्टिकोन संकुचित होतो. शिक्षणाचा अभाव, आरोग्‍यविषयक अपुरी माहिती व स्वच्छतेचा अभाव, स्वच्छतेच्‍या अपुऱ्या सुविधा यामुळे हा दृष्टि‍कोन निर्माण झालेला आहे. परिणामी लक्षावधी महिला व मुली मासिक पाळीच्या कालावधीमध्ये पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही.

            या पार्श्वभूमीवर जागतिक स्‍तरावर ‘मासिक पाळी स्वच्छता दिवस’ ही संकल्पना उदयास आली. ‘मासिक पाळी’ या विषयावर जनजागृती निर्माण करणे व या विषयाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टि‍कोन बदलणे, समाजातील विविध घटकांना ‘मासिक पाळी’ या विषयावर बोलते करणे हा या मासिक पाळी स्वच्छता दिवसाचा उद्देश आहे. मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्था, समाजमाध्यमे यांना एकत्र आणून महिला व मुलींसाठी मासिक पाळीच्या स्वच्छता व्यवस्थापनास प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम आखले जातात.

            मासिक पाळी स्वच्छता दिवसाची सुरुवात प्रथम जर्मनीमध्ये ‘वॉश युनायटेड’ या संस्थेने दिनांक २८ मे २०१४ मध्ये केली. तेव्हापासून २८ मे हा जागतिक स्तरावर मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. या मासिक पाळी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून पुणे जिल्हा परिषदेने एक नावीन्‍यपूर्ण उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील इयत्ता ८ वी ते १० वी मधील मुली तसेच १४ ते १६ वयोगटातील शालाबाह्य मुलींना सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा केला जाणार आहे.

            किशोरवयीन मुलींना मासिक पाळीमध्ये घेतल्या जाणाऱ्या स्वच्छतेचे महत्त्व आणि सॅनिटरी पॅडच्या वापराबाबत सवय निर्माण करणे व त्या अनुषंगाने मार्गदर्शन करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे.

            पुणे जिल्‍हा परिषदेच्‍या महिला व बालकल्याण विभागाच्‍यावतीने सन २०२०-२१ मध्ये ग्रामीण भागातील महिला व मुलींसाठी पुढीलप्रमाणे योजना राबविण्‍यात येत आहेत.

            1) इयत्‍ता ७ वी ते १२ वी पास मुलींना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संगणक प्रशिक्षणासाठी रक्‍कम रु. ३५००/- पर्यंत अनुदान 2) इयत्ता १२ वी मध्ये 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त गुण मिळविलेल्या (विशेष प्रावीण्य मिळवलेल्या) मुर्लीना पुढील शिक्षणासाठी पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर आर्थिक मदत रक्कम रु. ५०००/ पर्यंत अनुदान ३) आदिवासी व दुर्गम भागातील मुलींना इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंत तालुक्याच्या ठिकाणी शिकण्यासाठी अर्थसहाय्य करणे 4) ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी च्या मुलींना सायकलसाठी रक्कम रुपये ४५००/- पर्यंत अनुदान देणे  5) ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायाभिमुख व जीवनाश्यक वस्तू खरेदी करिता अनुदान देणे (पीठ गिरणी रक्कम रु. १२०००/- पर्यंत, शिलाई मशीन इ. रक्कम रु.७५००/- पर्यंत), 6) ग्रामीण भागातील महिलांना घरकुल दुरुस्तीसाठी रक्कम रु. ५०,०००/- पर्यंत अनुदान देणे.  या सर्व योजनांसाठी पुणे जिल्‍ह्यातील अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय, पंचायत समिती कार्यालय येथे संपर्क साधावा.

            एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत शून्‍य ते 6 वर्षे वयोगटातील बालके, गरोदर व स्तनदा माता यांना 1) अनौपचारिक शाळा पूर्व शिक्षण  2) पूरक पोषण आहार 3) लसीकरण 4) आरोग्य तपासणी 5) संदर्भसेवा 6) आहार व आरोग्य शिक्षण या सेवा गावातील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये दिल्या जातात.

            राज्‍यातील महिला व बाल विकासाच्‍या योजनांची योग्‍य अंमलबजावणी व्‍हावी यासाठी महिला व बाल विकास विभागाच्‍या मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांच्‍या मार्गदर्शनाखाली काम चालू आहे. पुणे जिल्‍हा परिषदेच्‍या योजनांची अंमलबजावणी अध्‍यक्षा निर्मला पानसरे, महिला व बालकल्‍याण विभागाच्‍या सभापती पूजा पारगे यांच्‍या मार्गदर्शनाखाली यशस्‍वीपणे सुरु आहे.

            पुणे जिल्‍ह्यात महिला सुरक्षा दक्षता समिती कार्यरत आहे. त्‍यांच्या मदतीसाठी शासन यंत्रणेचे संपर्क क्रमांक उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहेत. पुणे जिल्ह्यातील तालुका संरक्षण अधिकाऱ्याचे नाव व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे- आंबेगाव- अच्युत शेवाळे (9623693787), बारामती- मनिषा जाधव (9404221070), भोर- मयूर भुमकर (8796512326), दौंड- राजश्री खंदारे (7774056692), हवेली – भाग्यश्री घाडगे (8149873494), इंदापूर- शेखर बंडगर (9762108429), जुन्नर-अक्षय साळुंके (9175988969), खेड- प्रवीण नेहरकर (8855088782), मावळ- नूतन देवकर (9822959605), मुळशी- पद्माकर सुरसे (8149468579), पुरंदर-कविता चौरे (9503767478), शिरुर- युवराज गाढवे (9689799696) आणि वेल्हा- नितीन मोरे (9096210652)

            पुणे जिल्ह्यातील उपविभागीय सरंक्षण अधिकाऱ्यांची (उप विभागीय पोलीस अधिकारी) नावे पुढील प्रमाणे- बारामती विभाग- नारायण शिवरगावकर (9527513100, 02112-223630), दौंड विभाग- ऐश्वर्या शर्मा (9691981081, 02117-262333), भोर विभाग -अण्णासाहेब जाधव- (9922712100, 02115-223180), हवेली विभाग- सई भोरे पाटील (9421972522, 020-25658035), खेड विभाग- गजानन टोम्पे-(9545555505, 02135-222013), जुन्नर विभाग- दिपाली खन्ना (7219314433, 02132-223333), लोणावळा विभाग- नवनीत कुमार कावत (9560409479, 02114-273060)

            भरोसा सेल- कौटुंबिक हिंसाचाराशी निगडीत मदतीसाठी भरोसा सेल असून पुणे शहर- (020-26208341) आणि  पिंपरी चिंचवड साठी (020-27352500) हे दूरध्‍वनी क्रमांक आहेत.

       महिलांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरते निवासस्थान आवश्यक असल्यास एक थांब केंद्र- सखी (वन स्‍टॉप सेंटर) स्‍थापन करण्‍यात आले आहे. एक थांब केंद्र -सखी, येरवडा- (9579635511) आणि एक थांब केंद्र- सखी,  मुंढवा- (8275732421) यावर संपर्क साधून मदत घेता येऊ शकते. पुणे जिल्‍हा परिषदेचा टोल फ्री क्रमांक 18002334130 असा असून त्‍यावरही संपर्क साधून मदत मिळवता येवू शकते.

(राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय तर 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने...