पुणे विभागात ॲक्टीव रुग्णसंख्या झाली  2 हजार 607 तर दोन हजार 475 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी-एकुण 265  रुग्णांचा मृत्यू

Date:

पुणे दि. 20 :- पुणे विभागातील  2 हजार 475 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 हजार 347 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण  2 हजार 607 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 265  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 187 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील 4 हजार 525 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 184  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  2 हजार  114 आहे. कोरोनाबाधित एकूण 227  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच  178 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
 कालच्या बाधीत रूग्णाच्या संख्येच्या तुलनेत बाधीत  रूग्णाच्या संख्येमध्ये पुणे जिल्हयात 245 ,सोलापूर जिल्हयात 18 ,कोल्हापूर जिल्हयात 53, सांगली  जिल्हयात 7 व सातारा जिल्हयात 28 अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे.
  सातारा जिल्हयातील 166 कोरोना बाधीत रुग्ण असून 76 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.         ॲक्टीव रुग्ण संख्या 87  आहे. कोरोनाबाधित एकूण 3   रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सोलापूर जिल्हयातील  461 कोरोना बाधीत रुग्ण असून 168 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण संख्या 261 आहे. कोरोना बाधित एकूण  32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील 59 कोरोना बाधीत रुग्ण असून  34 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या  24  आहे. कोरोना बाधित एकूण  1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील 136  कोरोना बाधीत रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.   ॲक्टीव रुग्ण संख्या  121 आहे. कोरोना बाधित एकूण  2  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 60  हजार 90 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 49  हजार  259 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 10  हजार 882 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी   43  हजार  812 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 5  हजार 347  चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
             आजपर्यंत विभागामधील 1 कोटी 21 लाख 17  हजार 67 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत  5 कोटी 21 लाख 25 हजार 845  व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी  3 हजार 511 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
  वंदे भारत  मिशन अंतर्गत विभागामध्ये अत्तापर्यंत परदेशामधून 476 प्रवाश्यांचे आगमन झाले आहे. यापैकी  पुणे जिल्हयात 372, सोलापूर जिल्हयात 18 ,कोल्हापूर जिल्हयात 29, सातारा जिल्हयात 22व सांगली जिल्हयात 35 प्रवाशी आले आहेत. विभागातून 5 हजार 876 बसद्वारे 76 हजार 404 प्रवासी बाहेर गेले आहे. तसेच 294 बसद्वारे 5 हजार 832  प्रवासी विभागात आले आहेत, असेही  विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...