Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महाराष्ट्र पूर्णत: डिजिटल सक्षम करून शिक्षण-आरोग्य सेवा प्रभावी करणार; महाराष्ट्र सरकार – ओरॅकल दरम्यान सॅन फ्रॅन्सिस्को येथे ऐतिहासिक करार

Date:

मुंबई, दि. 21 : संपूर्ण महाराष्ट्र डिजिटल सक्षम करण्याचा आमचा निर्धार असून राज्यातील सर्व गावे डिसेंबर 2018 पर्यंत डिजिटली कनेक्ट केली जाणार आहेत. या माध्यमातून शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवेत लक्षणीय सुधारणा घडविण्यात येणार आहेत. त्यासोबतच सर्वसामान्य माणसाला मोबाईल फोनच्या माध्यमातून गतिमान आणि पारदर्शक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सॅन फ्रॅन्सिस्को येथे झालेल्या ओरॅकल ओपन वर्ल्ड-2016 या आंतरराष्ट्रीय परिषदेत दिली.  यावेळी राज्यात  राबविण्यात येत असलेल्या माहिती तंत्रज्ञानविषयक उपक्रमांना गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि ओरॅकल कंपनी दरम्यान महत्त्वाचा सामंजस्य करार करण्यात आला.

ओरॅकलच्या निमंत्रणावरून मुख्यमंत्री सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या कंपनीतर्फे आयोजित ओरॅकल ओपन वर्ल्ड-2016 या माहिती तंत्रज्ञानविषयक प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी श्री. फडणवीस प्रमुख निमंत्रित आहेत. या परिषदेत श्री. मुख्यमंत्री म्हणाले, भविष्यात मोठ्या संख्येने असलेली महत्त्वाकांक्षी तरुणाई भारताचे मोठे शक्तीस्थळ राहणार आहे. या लोकसंख्येचे मनुष्यबळात रुपांतर करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल. त्यासाठी सध्या योग्य वेळ येऊन ठेपली आहे. सर्वार्थाने निरपेक्ष असलेले प्रगत तंत्रज्ञान हे त्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे साधन आहे.  त्यादृष्टीने उपस्थित होऊ शकणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी येथे उपस्थित आहे. 2020 पर्यंत सर्व शासकीय प्रक्रिया ऑटो पायलट मोडवर टाकून सर्वार्थाने लक्षणीय सुधारणा घडवून आणण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचा लाभार्थी राज्यातला सर्वसामान्य माणूस असेल. यादृष्टीने राज्यात सर्वव्यापी डिजिटल स्थित्यंतर घडवून आणण्यात येत असून राजकीय नेते म्हणून आम्ही मांडलेल्या संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी तंत्रज्ञांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात ओरॅकलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सॅफ्रा कात्झ यांनी भारतात आणि महाराष्ट्रात विविध आघाड्यांवर होत असलेल्या परिवर्तनाबाबत माहिती देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे होत असलेल्या सकारात्मक बदलांबाबत प्रशंसोद्गार काढले.

राज्यात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी अभियानातील विविध कार्यक्रमांसह माहिती तंत्रज्ञानविषयक विविध उपक्रमांना सहकार्य करण्याची तयारी ओरॅकलतर्फे दर्शविण्यात आल्यानंतर त्यादृष्टीने आज या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या निमित्ताने ओरॅकल ही जगप्रसिद्ध कंपनी प्रथमच एखाद्या राज्याशी सामंजस्य करार करीत आहे. क्लाऊड कॉम्प्युटिंगमुळे प्रशासनाचा चेहरामोहरा पूर्णत: बदलणार असून सर्वसमावेशक विकासासह एक डिजिटल सक्षम राज्य म्हणून परिवर्तन घडविण्यासाठी हा करार महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त करताना ओरॅकलने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

या करारानुसार राज्यातील शहरांच्या भविष्यात निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या सेवाविषयक गरजांचा विचार करून त्या अनुरूप सुविधा, यंत्रणा उभी करण्यात ही कंपनी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या कंपनीचे कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि पिंपरी-चिंचवड अशा तीन महापालिकांना सहकार्य लाभणार आहे. त्यामुळे राज्यातील ही तीन शहरे स्मार्ट सिटी होण्याकडे महत्त्वाचे पाऊल टाकणार आहेत.

या करारानुसार शासकीय सेवांची कार्यक्षमता वाढण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने कंपनीतर्फे विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील 10 प्रमुख शहरांत राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी अभियानात नागरिकांना सेवा देणारी शासकीय यंत्रणाही अद्ययावत होणार आहे. यासाठी ओरॅकलतर्फे मुंबईत सेंटर ऑफ एक्सलन्सची उभारणी करण्यात येणार असून त्याच्या माध्यमातून सर्व स्मार्ट सिटीज मधील सेवाविषयक उपक्रमांचे समन्वय आणि संनियत्रण केले जाणार आहे.

तसेच विविध नाविन्यपूर्ण संकल्पनांवरही या केंद्रात संशोधन करण्यात येणार आहे. शासकीय यंत्रणेकडून नागरिकांना तसेच व्यापारी समुहांना दिल्या जाणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपायांचा शोध घेण्यात येणार आहे. त्यासाठी ओरॅकलमधील संबंधित विषय तज्ज्ञांची मदत होणार आहे.  मोबाईल ॲपसह विविध डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध प्रकारच्या नागरी सेवा देणाऱ्या यंत्रणांमध्ये समन्वय साधून या सेवांची गुणवत्ता वाढविणे आता शक्य होणार आहे. तसेच शहरांमधील नागरी प्रशासनात नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने अचूकता आणि कार्यक्षमता वाढण्यासही मदत होणार आहे.  या कराराच्या अंमलबजावणीसाठी ओरॅकल संपूर्ण यंत्रणा उभी करणार आहे. त्यामुळे एकत्रित परिणाम म्हणून राज्यातील स्मार्ट सिटी अभियानाला नवा डिजिटल आयाम प्राप्त होणार आहे.

कृषी विकासासाठी ॲमेझॉनचे सहकार्य

अॅमेझॉन कंपनीचे मॉनिक मेश यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. पुण्यात स्टार्टअपच्या क्षेत्रात आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी अॅमेझॉन वेब सर्विसेस कंपनी महाराष्ट्र शासनाबरोबर भागीदारी करण्यास इच्छूक आहे. लहान प्रमाणात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सप्लाय चेनसह इ-मार्केट तयार करण्यास सुद्धा महाराष्ट्र शासन व अॅमेझॉन हे सोबत काम करणार आहेत. यातून लहान शेतकऱ्यांना अधिक मोठी बाजारपेठ आणि व्यापक व्यापाराच्या संधी मिळतील. यातून त्यांच्या कृषीमालाला अधिक भाव मिळणे शक्य होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका निवडणुकीचा बिगुल सोमवार नंतर …

मुंबई- राज्यातील २९ महापालिकेत प्रशासक राज आहे. मात्र,...

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...