पुणे, दि. 9: विकास कामे चांगल्या दर्जाची, गुणवत्तेची झाली पहिजेत. विकास कामासाठी सर्व लोकप्रतिनिधीं, शासकीय अधिकारी यांनी एकत्र येवून समन्वयाने काम करावे. अशा सूचना जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अधिकारी आदिवासी उपयोजना समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव – पाटील, जि.प. अध्यक्ष प्रदीप कंद, आमदार सुरेश गोरे, आमदार शरद सोनवणे, वैधानिक विकास मंडळाचे सदस्य तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उमेशचंद्र सारंगी, जिल्हाधिकारी सौरभ राव, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, एकात्मिक विकास प्रकल्प घोडेगावचे प्रकल्प अधिकारी आर.आर. सोनवणे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, शासकीय अधिकाऱ्यांनी विकास कामे करतांना संबंधित लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी, समन्वय ठेवावा. तसेच चालू वर्षीची कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत यासाठी तांत्रिक प्रशासकीय मंजूरीची प्रक्रिया त्वरीत पूर्ण करावी. त्यानंतर वेळेत कामे सुरु करण्याच्या सूचना दिल्या.
सदर बैठकीत 2015 -16 चा मार्च अखेर झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. मार्च अखेर 98.94 टक्के खर्च झाला आहे. अशी माहिती प्रकल्प अधिकारी यांनी दिली. 2016 -17 च्या ऑगस्ट अखेर झालेल्या कामांचा आढावाही यावेळी घेण्यात आला. सदर वर्षातील खर्च कमी असल्याबद्दल पालकमंत्र्यांनी विचारणा करुन कामाची गती वाढविण्याच्या सूचन दिल्या.
या बैठकीत पडकई योजना, कृषी, पशुसंवर्धन, मस्य विकास, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पाटबंधारे वाहतुक व दळणवळण, आरोग्य, क्रीडा आदि विभागाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. क्रीडा विकासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री बापट यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील विविध समस्यां मांडल्या

