पुणे, दि. 9: मुद्रा बॅक योजनेत जिल्हयात चांगले काम झाले असून राज्यात प्रथम क्रमाकांवर आहे. यामध्ये अधिक चांगले काम करुन जिल्हा देशात प्रथम आला पाहिजे या दृष्टीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुद्रा योजनेच्या बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा समितीचे सदस्य सचिव तथा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. देशमुख, समितीचे समन्वयक जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री बापट म्हणाले की, या योजनेत जिल्हयात आतापर्यंत 53 जणांना सुमारे 1 हजार कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या बेकारी निर्मूलनासाठी विविध व्यवसायासाठी सहाय करण्याच्या विविध योजना आहेत.याबाबत प्रभावी जन जागृती करावी. लोकप्रतिनिधींचा सहभाग घेवून अंमलबजावणी केल्यास अधिक प्रभावी अमंलबजावणी केली पाहिजे. पैसा नाही म्हणून ज्यांची प्रगती अडली आहे, त्यांना या योजनेद्वारे वेळेवर मदत केली तर त्यांच्या जीवनात बदल होईल. अनेक तरुणांना काही करण्याची इच्छा असते, पण पैशाअभावी करु शकत नाही, त्यामुळे गुन्हेगारीकडे वळणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
सदर बैठकीत बँक निहाय 2015 -16 व 2016-17 मध्ये किती कर्ज दिले. किती वसुली झाली, किती थकबाकी आहे. कोणत्या लाभार्थ्यांना कोणत्या व्यवसायासाठी कर्ज दिले याबाबत माहिती बैठकीत सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
या प्रसंगी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या योजनेत जिल्हयात चांगले काम झाले आहे. याची माहिती प्रभाविपणे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.
सदरील बैठकीत अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तथा सदस्य सचिव देशमुख यांनी या योजनेमधील शिशु, किशोर, तरुण याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच या योजनेमध्ये जिल्हयात आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती दिली. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी ज्या बँकेंचे काम समाधानकारक नाही याबाबत विचारणा करुन कामात सुधारणा करावी व अधिक गतीने काम करण्याच्या सूचना दिल्या.

