पुणे : एखाद्या व्यक्तीचे अपघाती / आकस्मिक निधन झाल्यास त्यांच्या नातेवाईकांनी
थोडीशी हिंमत दाखवून अवयवदानाचा धाडशी निर्णय घेतल्यास अन्य गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकते. मृत्युलारोखण्याची ताकत अवयवदानासारख्या श्रेष्ठ दानात आहे. असे प्रतिपादन येथील बी. जे. वैद्यकीय
महाविद्यालयातील डॉ. सोमनाथ सलगर यांनी केले.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने गणेशउत्सवात सामाजिक जाणीव जागृती, प्रबोधन करण्यासाठी संवादपर्व उपक्रम राबविला जात आहे. यानिमित्त महात्मा फुले पेठेतील जय शंकर गणेश मंडळाच्या सहकार्याने आयोजित संवादपर्व उपक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी माहिती उपसंचालक यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी, मंडळाचे पदाधिकारी स्नेहल पिंपळे, विकास ताटीपामुल, प्रविण दावत्रे, वैभव पिंपळे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. सलगर म्हणाले की, गणेश उत्सवात सामाजिक प्रबोधन करण्यासाठी माहिती व जनसंपर्क
विभागाने प्रथम संवादपर्व हा अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. यानिमित्ताने अवयवदानासारख्या श्रेष्ठदानाबाबत प्रबोधन करण्याची संधी मिळाली याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच अवयवदानाबाबत सविस्तर माहिती देवून या उपक्रमाव्दारे या मंडळाच्या युवकांनी प्रेरणा घेवून अवयवदानाची चळवळ वाढवावी असे आवाहन केले.
यावेळी माहिती उपसंचालक यशवंत भंडारे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने
संवादपर्व या उपक्रमाव्दारे विविध शासकीय योजनांची माहिती गणेश मंडळाच्या सहकार्याने जनतेपर्यंत
पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. तसेच या उपक्रमाबाबतची सविस्तर माहिती दिली.
सदर प्रसंगी गणेश मंडळाच्या वतीने अवयवदानाबाबत प्रबोधन करण्याची चित्रमय प्रदर्शनाचेही
आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी मंडळाचे निलेश परदेशी, अमर फुरली, विवेक वराडे, विठ्ठल इराबाचीतन आदि कार्यकर्ते तरुण, युवक , नागरिक उपस्थित होते.

