पुणे, – महिला आणि रेल्वे प्रवाशांच्या सुविधेकरिता प्रतिसाद ॲप, पोलीस मित्र महाराष्ट्र
ॲप आणि वाहन चोरीची तक्रार तत्काळ नोंदविता यावी यासाठी वाहन चोरी तक्रार वेबसाईटचे
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
राज्य राखीव पोलीस दलाच्या बल गट क्रमांक दोन येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला.
यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री राम शिंदे, महापौर प्रशांत जगताप, आमदार माधुरी
पोलीस विभागात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि नागरिकांना तत्काळ सेवा
उपलब्ध करून मिळाव्यात यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्मार्ट पोलिसिंग ही
कल्पना साकारू शकेल,असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यासह अनेक
वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. ही विविध ॲप्स विकसित करणाऱ्या व्यक्तिंचा मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.