Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मंत्री दिलीप कांबळे , महापौर प्रशांत जगताप,कॅनटोन्मेटचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर यांचा सत्कार

Date:

पुणे-वानवडी भागाच्या सर्वागीण विकासासाठी आम्ही कटीबद्ध राहण्याचे आश्वासन राज्याचेमंत्री दिलीप सामाजिक न्याय राज्य कांबळे यांनी दिले .

वानवडी मधील केदारी गार्डन मध्ये वानवडी ग्रामस्थ आणि केदारी गार्डन मित्र परिवारच्यावतीने आयोजित भव्य सत्कार सोहळ्या प्रसंगी राज्यमंत्री दिलीप कांबळे  बोलत होते . नामदार  कांबळे यांनी सांगितले कि , वानवडी भाग गेले अनेक वर्षापासून दुर्लक्षित आणि विकासापासून वंचित राहिलेला भाग आहे . त्यामुळे येथील वानवडी च्या दोन्ही बाजूच्या सीमेवर वाहणारे दोन नाल्यामध्ये नाला गार्डन केद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या निधीतून बांधू , तसेच सोलापूर महामार्गचे फातिमानगर येथील रुंदीकरण व भव्य उड्डाण पूल उभारण्याची मागणी पूर्ण करून तेथील वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्नरू , वानवडी मधील जुन्या मंदिराचा जीर्नोद्वार लोकवर्गणीमधून करू . आपल्या मतदार संघातील दलित बांधवासाठी अडीच कोटी तर अल्पसंख्यांक बांधवासाठी पाच कोटी रुपये निधी आपण उपलब्ब्ध करणार आहोत .

नवनिर्वाचित पुण्यनगरीचे महापौर प्रशांत जगताप , पुणे कॅनटोन्मेट बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर यांचा जाहीर सत्कार वानवडी येथे केदारी गार्डन मित्र परिवार व वानवडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा राज्याचे सामाजिक न्याय राज्य मंत्री यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी वानवडी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . या सत्कारच्या वेळी उत्तम केदारी यांनी पुणे महानगरपालिका व पुणे कॅनटो न्मेट सीमेवरील नाले तसेच सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण व वानवडी गावातील जुन्या देवळांच्या जीर्नोद्वारबाबतच्या समस्या या सर्वा पुढे मांडल्या .

यावेळी राज्याचे सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे ,  महापौर प्रशांत जगताप , पुणे कॅनटोन्मेट बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर हे तिघेही वानवडी गावचे रहिवासी असून या तिघांचा भव्य सन्मान सोहळा संपन्न झाला . याप्रसंगी या तिघांना वानवडी गावातील समस्या माहिती असल्याने सदर समस्या लवकरात लवकर दूर करण्याबाबत या तिघांनी आपापल्या परीने व वेगवेगळ्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासन देऊन याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले .

या सत्कार प्रसंगी महापौर प्रशांत जगताप यांनी आपला महापौर निधी वानवडीच्या विकासासाठी देऊ , आज झालेला आमचा घरचा सत्कार आहे , आणि घरचा सत्कार झाल्याने मी आज आनंदित झालो आहेत . हा खऱ्या अर्थाने वानवडीकरांचा सन्मान आहे .

यावेळी दिलीप गिरमकर यांनी देखील वानवडीच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत , आपण लहानाचे  मोठे  वानवडी येथे झालो असून या वानवडी गावाशी जिव्हाळ्याचे संबध असल्याने आम्हाला या पदाच्या माध्यमातून विकासकामे करण्याची संधी आहे .

या कार्यक्रमामध्ये माजी महापौर विठ्ठलराव लडकत , अम्मानुला खान , नगरसेविका नंदा लोणकर , बाळासाहेब कचरे , अड. अर्जुन खुर्पे , माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप , सुदाम जगताप , मुरलीधर निंबाळकर , जयप्रकाश पुरोहित , माजी नगसेवक नवनाथ कांबळे , हनुमंत साठे , बाबासाहेब जाधव , महेंद्र कांबळे , गनी शेख , बाळासाहेब गव्हाणे , विठ्ठल जांभुळकर , शिवराम जांभुळकर , कैलास आबनावे , मकरंद केदारी , रवींद्र चौघुले , तुकाराम गवळी , चंद्रकांत तोंडारे , सुरेश होले , बाळासाहेब घोलप , उषा माळी , नूतन शिवरकर आदी मान्यवर व वानवडी ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत उत्तम केदारी यांनी केले , तर सूत्रसंचालन दिनेश होले यांनी केले तर आभार वसंत केदारी यांनी मानले . या कार्यक्रमाचे संयोजन विठ्ठल केदारी , केरुपंत केदारी ,  विक्रांत केदारी , अमित केदारी , चेतन केदारी , अभय गवळी , साहिल खोपकर , रोहित केदारी  यांनी केले . या कार्यक्रमच्या शेवटी सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाची मोहोर:आता मतमोजणी 21 डिसेंबरलाच

नवी दिल्ली- राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची मतदान...

पुतिन यांना राष्ट्रपती भवनात 21 तोफांची सलामी:राजघाटावर गांधींना श्रद्धांजली वाहिली

नवी दिल्ली- रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे राष्ट्रपती भवनात...