Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

दिलीप प्रभावळकरांचा हास्य चौकार!

Date:

हसगत‘ आणि पत्रापत्रीसोबत प्रभावळकरांची गुगली-नवी गुगली‘!

अभिनयातील सहजता, नेमकेपणा, भूमिका निवडीतील चोखंदळपणा व स्वीकारलेल्या भूमिकांना न्याय देण्याची वृत्ती, अभिनय व लेखन या दोन्ही कलांनी मराठी नाट्य-चित्रपटक्षेत्रात आणि साहित्यक्षेत्रातही स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीनिशी दिलीप प्रभावळकर यांनी आपले बळकट स्थान निर्माण करून प्रदीर्घ नाट्य-चित्र कारकिर्दीत घडवून प्रेक्षकांच्या मनावर अनेक दशके राज्य केले आहे. विनोदी लेखनाची प्रचंड आवड असलेल्या प्रभावळकरांच्या साहित्य निर्मितील खटयाळ, मिश्कील, निरागस, खुमासदार शैलीद्वारे वाचक – श्रोत्यांसोबत संवाद साधण्याच्या विशेष हातोटीमुळे त्यांचा एक विशेष वाचक-रसिक वर्ग जगभर तयार झाला आहे. त्यांच्यासाठी विशेष आनंदाची बाब म्हणजे ‘स्टोरीटेल’ने नुकतेच त्यांच्या चार वेगवेगळ्या धाटणीचे लेखसंग्रह ऑडिओ स्वरूपात आणले आहेत. या सर्व लेखांचे सादरीकरण प्रत्यक्ष प्रभावळकरांच्याच आवाजात ऐकायला मिळत असल्याने हा एक दुग्धशर्करा योग म्हणता येईल.

क्रिकेट, खेळाडू, खेळाडूंचं वर्तन, मैदानाबाहेरील घडामोडी अशा अनेक गोष्टींवर प्रभावळकरांनी खुमासदार लेख लिहिले. खळखळून हसायला लावणारे, वरकरणी मनोरंजनात्मक भासणारे हे लेख विसंगती टिपणारे आणि चिमटे काढणारेही आहेत. या लेखांचा संग्रह म्हणजे ‘नवी गुगली’. ‘षट्कार’ या निखिल वागळे संपादित क्रीडा-मासिकात दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेल्या तुफान विनोदी लेखांचा संग्रह म्हणजे ‘गुगली’. हा महत्वाचा ऐवज खास स्टोरीटेलच्या श्रोत्यांसाठी दस्तुरखुद्द प्रभावळकरांच्याच आवाजात ऐकताना धम्माल मनोरंजन होते. यासोबतच त्यांचा विनोदी ललित लेखसंग्रह ‘हसगत’ ऐकतानाही अशीच मजा येत राहते.

आपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध… हे या पत्रापत्रीचं स्वरूप. तात्यासाहेब आणि माधवराव या जोडीगोळीच्या साहाय्याने दिलीप प्रभावळकर हा पत्रप्रपंच मांडतात. यात कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो; तर कधी आफ्रिकावारीतले ‘उदयोग’ हसू आणतात. याच पत्रांतून कधी आयपीएलवरचं भाष्यं समोर येतं, तर कधी होर्डिग्जच्या सुळसुळाटासंबंधीचं तिरकस मत…तात्कालिक घटनांकडे पाहण्याचा प्रभावळकरांचा मिश्किलपणा या ‘पत्रापत्री’त रंगत आणतो. या सर्व विविधांगी मनोरंजन करणाऱ्या कथा स्वतः प्रभावळकर आपल्या शेजारी बसून आपल्याला ऐकवत आहेत असा भास ऐकणाऱ्याला होत राहतो.

प्रभावळकरांचे खुमासदार लेखन ऐकण्यासाठी खालील लिंक पहा..

नवी गुगली  – https://www.storytel.com/in/en/books/navi-googly-1541238

गुगली – https://www.storytel.com/in/en/books/googly-1541228

हसगत – https://www.storytel.com/in/en/books/hasgat-1541217

पत्रापत्री – https://www.storytel.com/in/en/books/patrapatri-1541264

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आज इंडिगोची ६५० हून अधिक उड्डाणे रद्द:६१० कोटी केले रिफंड,३०००प्रवाश्यांच्या बॅगा दिल्या परत …

मुंबई-आज इंडिगोच्या ६५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही...