आघाडी कडून महापौरपदासाठी प्रकाश कदम उपमहापौर पदासाठी चांदबी हाजी नदाफ
पुणे- महापौर ,उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताच सध्या भाजपचे महापालिकेत बहुमत असले तरी भाजपमधील अनेक नगरसेवक या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याशी संपर्क साधून आहेत असा दावा पालिकेतील विरोधीपक्षनेते राष्ट्रवादीचे दिलीप बराटे यांनी केला
पुणे महानगरपालिका महापौरपदासाठी राष्ट्रवादीचे प्रकाश कदम यांनी तर, काँग्रेसतर्फे चांदबी हाजी नदाफ यांनी आज, सोमवारी अर्ज दाखल केला.
काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक हाजी गफूर पठाण, सचिन दोडके, योगेश ससाणे, युवराज बेलदारे, भैय्या जाधव, गणेश ढोरे, नगरसेविका सायली वांजळे, प्रिया गदादे यावेळी उपस्थित होते.
आघाडीमध्ये शिवसेना सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे नगरसेवक अनुपस्थित होते. मतदानादरम्यान शिवसेना आमच्याबरोबर असणार असा, विश्वास विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी व्यक्त केला तर, भाजपमधील नाराज गट फुटून आपल्याला महापौरपदासाठी मदत करणार असल्याचे दिलीप बराटे यांनी म्हटले आहे.