दस्त नोंदणीचे कामकाज 26 जूनला सुरु

Date:


पुणे दि.25: – कोवीड -19 मुळे उद्भलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे एप्रील व मे महिन्यात लॉकडाऊनमुळे विहित कालावधीत नोंदणी न झालेल्या दस्तांवर देय होणारी शास्ती महाराष्ट्र नोंदणी नियम 27 च्या प्रचलित तरतुदीप्रमाणे माहे डिसेंबर 2020 मध्ये पुर्ण मुद्रांकित व निष्पादीत अभिहस्तांतरण, विक्री करारनामा तसेच महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील 36 (4) मधील दस्तांवर प्रथम दोन महिन्यासाठी तर माहे जानेवारी 2021 मध्ये पुर्ण मुद्रांकित व निष्पादित दस्तांवर प्रथम महिन्यासाठी देय होणारी शास्ती कमी करुन ती रु.1000/- इतकी निश्चित करण्याबाबतचे शासनाचे निर्देश प्राप्त झाले आहेत.
या सवलतीचा जास्तीत जास्त नागरीकांना लाभ मिळावा यासाठी दस्तऐवज नोंदणीची सुविधा पुणे ग्रामीण जिल्हयातील सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग-2/ दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालये माहे जून महिन्यातील 26 जून 2021 या शासकीय सुट्टीच्या दिवशी सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग-2 / दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालये कार्यालयीन वेळेत दस्त नोंदणी व कार्यालयीन कामकाजासाठी सुरु ठेवण्यात येत असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे सह जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दि.पं पाटील यांनी एका पसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
सह दुय्यम निबंधक बारामती, बारामती क्र.2, दुय्यम निबंधक कार्यालय, आंबेगांव, भोर, दौंड, इंदापूर, नारायणगांव, केडगांव, खेड, खेड क्र. 2, खेड क्र. 3, लोणावळा, मावळ, मावळ क्र.2, मुळशी, मुळशी क्र.2, जुन्नर, पुरंदर, शिरुर, तळेगांव ढमढेरे, वेल्हा हे कार्यालय सुरु राहणार आहेत.
या संधीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पुणे ग्रामीणचे सह जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दि.पं पाटील यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबई महापालिकेचे बजेट 80,952 कोटींचे,पण तब्बल 36 हजार कोटींच्या ठेवी वापरणार….

मुंबईकरांसाठी या अर्थसंकल्पात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे....

बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे – प्रा. सुशोभन पाटणकर

ए आय तंत्रज्ञानाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी शहानिशा आवश्यक पिंपरी,...

मुंबई प्रमाणे पुण्यातही 500 चौ. फूट घराला मिळकत कर शून्य करा- स्थायी च्या पहिल्या बैठकीत कॉँग्रेस चा प्रस्ताव

ऐतिहासिक निर्णयाबाबतचा चेंडू आता अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंच्या मैदानात.. प्रशासनाचा...

सोलर एनर्जी प्रकल्प वापरणाऱ्यांना मिळकत करात 10 टक्के सवलत द्या – दुधाने आणि मानकर यांचा प्रस्ताव

पुणे-सोलर एनर्जी प्रकल्प, म्हणजेच सूर्यप्रकाशाद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प...