मधुमेहावर नियंत्रण आणणे शक्य -डॉ.जगन्नाथ दीक्षित

Date:

पुणे-आपल्या देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून तरुण वयात ही मधुमेहाने झडलेले अनेक युवक बघायला मिळतात हा देशाच्या दृष्टीने देखील चिंतेचा विषय आहे, मात्र मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी व तसेच वजन कमी करण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन करून योग्य मार्गदर्शनाच्या आधारे त्याचे तंतोतंत पालन केले तर मधुमेहासारखे असाध्य रोग देखील नियंत्रणात आणता येऊ शकतील. गोळ्या अथवा इन्सुलिन हा तात्पुरता उपाय आहे, कायमचा मधुमेह नष्ट करण्यासाठी व मधुमेह मुक्त होण्यासाठी कंबर कसून काम केले पाहिजे, यासाठी 100, 200, 300 मधुमेह रुग्णांची छोटी युनिट्स करून त्याद्वारे चांगले मार्गदर्शन मिळून मधुमेह नियंत्रण आणणे अखेरीस मधुमेह मुक्त होणे असे प्रतिपादन ज्येष्ठ मधुमेह तज्ञ डॉ जगन्नाथ दीक्षित यांनी केले

पुण्याच्या सहकार नगर भागातील तुळशीबागवाले मैदानात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते

आधार सेवा केंद्राचे अध्यक्ष हेमंत आबा बागुल यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे मनपा काँग्रेस पक्ष नेते आबा बागुल होते

याप्रसंगी सांस्कृतिक दिवाळीतील हा कार्यक्रम सर्वांना उपयोगी पडो अशी प्रारंभी सदिच्छा व्यक्त करून हेमंत बागुल म्हणाले की, ”स्वतः साठी वेळ काढून नाही जगलात तर काय जगलात” असे सांगत देशात 10 कोटीहून अधिक मधुमेह नागरिक असून त्याची संख्या वाढत आहे मानसिक ताण, अयोग्य आहार, व्यसनाधीनता बैठे जीवन व व्यायामाचा अभाव या पाच गोष्टींमुळे हा रोग जडतो व डॉ जगन्नाथ दीक्षित यांच्या सारख्यांचा सल्ला तंतोतंत आत्मसात केला पाहिजे असे सांगून सर्वांना मधुमेह मुक्त होणाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे मनपा काँग्रेस पक्ष नेते आबा बागुल म्हणाले की मधुमेहासारखे रोग नियंत्रित आणणे प्रत्येकाचे स्वप्न असून त्यासाठी धन्वंतरी आपल्या दारी असा हा कार्यक्रम आयोजित केला आहे
आरोग्याची गोळी बाजारात कुठेही विकत मिळत नाही असे सांगून केवळ वयाच्या 60 व्या वयापासून नव्हे तर तरुण वयापासून हृदय विकार, ब्लड प्रेशर, असे विकार जडणार नाहीत यासाठी डॉ जगन्नाथ दीक्षित यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे होते

यावेळी डॉ जगन्नाथ दीक्षित म्हणाले की, मधुमेह हा वंशपरंपरागत रोग आहे तसेच अनेक कारणांमुळे ही व्याधी जडू शकते आपल्याला त्यावर सातत्याने देखरेख करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि तो नियंत्रनात आणता येऊ शकतो हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे देशात आता वैद्यकीय आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता येत असून हेमंत बागुल यांच्या सारख्या तरूणांनी अश्या प्रकारच्या व्याख्यानाचे आयोजन करणे ही देखील कौतुकाची बाब आहे

जगभरात फिरताना मधुमेहाची व्याधी किती मोठी आहे याची जाणीव होते, याचे दुष्परिणामही अनेकांनी अनुभवले आहे मधुमेह नियंत्रणात आणण्यासहित मधुमेह मुक्त होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्या पध्दतीची जीवनशैली अंगिकारली तर आपण मधुमेह मुक्त जीवन जगू यापासून सुटका होऊ शकते, यासाठी छोटे युनिट्स करून 100 मधुमेह रुग्णांनी एकत्र येऊन सातत्याने तपासणी करणे ज्यास दीक्षित डाएट म्हंटले जाते त्याचा अवलंब करत चळवळ उभी केली पाहिजे
तरुणांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले पाहिजे अशी आशा डॉ जगन्नाथ दीक्षित यांनी यावेळी व्यक्त केली

याप्रसंगी आधार सेवा केंद्र अध्यक्ष हेमंत बागुल यांनी स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले घनश्याम सावंत यांनी आभार प्रदर्शन केले

यावेळी मंचावर विशेष उपस्थिती म्हणून श्री. प्रसन्नजीत फडणवीस, श्री राजीव बर्वे, सौ बर्वे, धोंगडे काकू ,श्री देशपांडे असे अनेक मान्यवर उपस्थित होते

तसेच यावेळी मंचावर(डावीकडून) सौ जयश्री बागुल, श्री आबा बागुल,श्री घनश्याम सावंत , डॉ. दीक्षित कार्यक्रमाचे आयोजक हेमंत बागुल आदी उपस्थित होते

कार्यक्रमा नंतर प्रश्नोत्तरे घेण्यात आली यावेळी डॉ जगन्नाथ दीक्षित यांनी अनेक नागरिकांना विविध प्रश्नांची उत्तरे देत मार्गदर्शन केले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...

सत्तेच्या लोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल..अरविंद केजरीवाल,भगवंत मान पुण्यात प्रचाराला येणार

पुणे- ' महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य...

प्रशांत जगतापांच्या राजीनाम्याचे वृत्त बदमाशीचे ..खोडसाळ

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप...