पुणे-सौ.शुशीलबेन मोतीलाल शहा चैरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष व जेष्ठ समाजसेवक मोतीलाल शहा यांचे 85 व्या वाढदिवसनिमित महिलादिनी 8 मार्च 2020 रोजी *महावीर प्रतिष्ठान मध्ये दुपारी 5 वाजता शहा कुटुबियान तर्फे दिव्यांगाना 6 ट्रायसिकल ,वावरहिरे,सातारा, येथील तानाजी धर्माधिकारी, पुसेगाव चे गुरव,लोणंद चे प्रवीण रासकर,शिरवळ चे सचिन पंडित,शेवगाव चे गोसावी,बारामती चे तरंगे व 4 व्हीलचेयर आणि अंध स्टिक तसेच अंध,विकलांग,मूकबधिर ,अनाथ व गोशाळा चालवीणारे 10 सामाजिक संस्थाना प्रत्येकी रु.दहा हजारांचे धनादेश वाटप केले. तर पत्नी सौ.सुशीलाबेन शहा वय वर्षे 84 यांनी देखील 50 गरजवंत महिलाना पती मोतीलाल यांचे वाढदिवसनिमित महिलाना साड्या चे वाटप केले. कार्यक्रमाचे आयोजन शहा कुटुब ,भारत विकास परिषद व रतन माळी आणि रघुनाथ ढोक , यांनी केले प्रवीण दोशी, चंद्रकांत दर्डा,दीपक गुंदेचा,मदनलाल दर्डा ,सुविधा नाईक,वासुदेव केंच,मीरा बडवे,सौ.शकुंतला पोखरणा ,जितेंद्र शहा,नानाभाऊ माळी, माधव चिरमे,शैलेश शहा,सौ.नेत्रा शहा ,व इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.जान्हवी व अतुल सलाग्रे मोलाचे सहकार्य सुनील शहा,मनोज शहा ,आकाश ढोक ,सौ.नीना शहा,चेतन शहा,सौ.स्मिता शहा यांनी केले या कार्यक्रमात बचपन वर्ल्ड फोरम चे लहान मुलांनी कष्टकरी आई बाप यांचे गीतावर नृत्य व सामूहिक गीत गायन करून या सोहळ्याला रंगत आणली
दिव्यांगाना ट्रायसिकल ,व्हीलचेअर व सामाजिक सस्थाना धनादेश वाटपाचा सोहळा संपन्न
Date:

