सर्व जाती धर्माने काळाची गरज म्हणून महात्मा फुले यांच्या सत्यसोधक पद्ध्तीने विवाह करावेत –मंत्री भुजबळ

Date:

नाशिक(पंचवटी)-फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फाउंडेशन ,पुणे च्या बहुउद्देश्यीय सत्यसोधक केंद्रातर्फे नाशिक  येथील सत्यसोधिका डॉ.शलाका संजय जाधव एमडीएस ,येवला आणि नाशिक मधीलच  सत्यसोधक अदित्य सुरेश कमोद बीई.कॉम्पुटर या उच्चशिक्षितांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या  सत्यसोधक पध्दतीने सत्यसोधक विवाह विधिकर्ते रघुनाथ ढोक   यांनी महात्मा फुले यांचे वेशभुषेत, जे.एस.एल बँकेट हॉल पंचवटी,नाशिक येथे सत्याचा अखंड गाऊन  सत्यसोधक पद्ध्तीने विवाह सोमवार दि.२०.1.२०२० रोजी दुपारी 1 वाजता लावला. यावेळी विवाह झाले बद्दल  सत्यसोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोरसमजसुधारक महात्मा फुले आणि क्रांतीज्योति सावित्रिमाई फुले यांचा  फोटो महा. राज्याचे अन्न पुरवठा व नागरी संरक्षण मंत्री व नाशिक चे पालक मंत्री ना.छगन भुजबळ यांचे शुभहस्ते वधु वर यांना भेट देण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे मंत्री  आणि विवाहाचे साक्षीदार म्हणून त्यांनी सत्यसोधक विवाह नोंदणी रजिस्टरमध्ये फोटो देऊन सही केली हा योग महाराष्ट्रातील पहिलाच असुन सत्यसोधक विवाहाला , आणि चळवळीला प्रेरणा देणारा ठरला आहे..तर  फुले एजुकेशन तर्फे दोन्ही कुटुंबाला सत्यसोधक विवाहासाठी पुढाकार घेतला म्हणून त्यांना राजर्षि शाहू महाराज,महात्मा फुले ,सावित्रिमाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एकत्रित असलेली प्रतिमा रघुनाथ ढोक यांनी सौ .मीनाताई छगन भुजबळ यांचे  हस्ते भेट दिली. सुरुवातीला वधू वरांचे हस्ते सुरवातीला महात्मा फुले व सावित्रिमाई फुले यांच्या अर्ध पुतळयास हार अर्पण करून त्यांनी आई वडील आणि विवाहास आलेल्या सर्वाना  नमस्कार करून आशीर्वाद घेतला तर वराचे वडील सुरेश कमोद यांनी मंत्री ना.भुजबळसाहेब यांना महात्मा फुले पगडी,उपरणे आणि पुष्पगुच देऊन स्वागत केले. या प्रसंगी वधु वर यांना आशीर्वाद देताना  पालक मंत्री ना.भुजबळ साहेब  म्हणाले की डॉ.जाधव आणि उद्योजक कमोद  कुटुबीयांनी सत्यसोधक पध्दतीने विवाह करण्याचा योग्य निर्णय घेतला असून या पुढे सर्वानीच तो आमलात आणून सर्व जाती धर्माने  काळाची गरज म्हणून महात्मा फुले यांच्या सत्यसोधक पद्ध्तीने विवाह करावेत  कारण महात्मा फुले यांनी आपणास सांगतिले की हा विवाह कोणतेही स्री पुरुष लाऊ शकतो यास भटजीची गरज नाही, पुढे असेही म्हणाले की आपणच आपले विवाह लावणे यात वावगे नसून अंधश्रद्धा,कर्मकांड याला महत्व देऊ नये. विवाहासाठी कोणत्याही मुहुर्ताची व पत्रिका बघण्याची गरज नाही व 365 पैकी कोणताही दिवस निवडता येतो  असेही  भूजबळ म्हणाले. तसेच पुणे वरून येऊन रघुनाथ ढोक यांनी  महात्मा फुले यांचे वेशभुषेत हा सत्यसोधक विवाह लावला तसेच पुणे येथे २५ जानेवारी २०२० रोजी  लंडन चा ब्राह्मण मुलगा अँड.सिद्धार्थ लिखिते आणि पंजाब ची मुलगी प्रीती कौर उच्चशिक्षित यांचा सत्यसोधक पद्ध्तीने विवाह लावणार म्हणूनही ढोक यांचे अभिनंदन केले. या वेळी माळी आवाज मासिकाचे कार्यकारी संपादक हनुमंत टिळेकर आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्त प्रा.सुदाम धाडगे ,रघुनाथ ढोक  यांनी महात्मा फुले रचित मंगलाष्टकं म्हणून विवाहास रंगत आणली आजच्या विवाहात अक्षता ऐवजी फुलांच्या पाकळया वापरून पायदळी तुडवीले जाणारे तांदळाची नाशाडी थाबविले त्याबद्दल व या सत्यसोधक विवाहबद्दल अनेकांनी दोन्ही  कुटुबियांचे अभिनंदन केले. या वेळी नाशिक चे कलेक्टर  सुरज मांढरे ,आमदार नरेंद्र दराडे,आमदार  किशोर दराडे ,माजी आमदार  वसंत गीते, माजी आमदार पंकज भुजबळ  नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे ,दशरथ खेडकरसाहेब , तसेच ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ कैलाश कमोद ,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चे कार्याध्यक्ष बापू भुजबळ ,रवी सोनावणे ,मुंबईचे  जज्ज अबंटकरसाहेब , अँन्ठी करेप्श्न्चे सुनील कडासनेसाहेब  ,सोलापूरचे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ .निशिगंधा कोल्हे,पुणे मनपाचे कायदेशीर सल्लागार मंजुषा इदाते, डेप्युटी कलेक्टर जाधवसाहेब  ,रिटायर्ड अँड.एस.पी.महाजनसाहेब ,डॉ.बी.के.यादव ,डॉ .वाय.पी .जाधव,जे.के.उमाळेसाहेब सर्व पक्षातील नगरसेवक ,समता परिषदेचे पदधिकारी ,सत्यसोधक चळवळीचे अनेक  कार्यकर्ते  ,जेष्ठ मार्गदर्शक  व अन्य मान्यवर  मोठ्या प्रमाणत   हा सत्यसोधक विवाह सोहळा पहानेसाठी आवर्जुन उपस्थित होता. मंत्र्याचे कुटुबातील आणि त्यांचे प्रमुख उपस्थितीत देशातील पहिला सत्यसोधक विवाह होणे कामी मोलाचे सहकार्य माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार योगेश कमोद यांनी केले ,तर डॉ .शेफाली भुजबळ यांनी आभार मानले. मोलाचे सहकार्य मधुकरराव जेजुरकर ,समाधान जेजुरकर ,आकाश ढोक यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...