वानवडी(पुणे)-फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे सत्यशोधक प्रसाद शिवराम जांभुळकर आणि सत्यशोधिका प्रियंका प्रभूचंद्र जन्नू यांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक पद्धतीने बुधवार .26.12.2018 रोजी सत्यशोधक विवाह सायंकाळी 7 वा. जरांडे लाँन्स ,महमदवाडी येथे मोठया दिमाखात संपन्न झाला.वधु वरांनी सुरुवातीला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
ह्या सत्यशोधक विवाहाची माहिती देऊन या विवाहासाठी कोणत्याही वेळेची,दिवसाची निवड करता येथे तसेव अक्षता म्हणून फुलांचा वापर करून ते तांदुळ व अधीक वस्तू अनाथाआश्रमास व इतर ठिकाणी अन्नदान मदत म्हणून देता येते असे सांगून
ऍड.दिगंम्बर आल्हाट व महाराष्ट्र शासनाचे फुले साहित्य चरित्र साधने व प्रकाशन समितीचे सदस्य व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ,पुणे महानगर पश्चिम चे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी विवाह लावला तर इंदापूर चे सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे व पत्रकार सुधाकर बोराटे यांनी महात्मा फुले यांचे मंगलास्टका म्हणून सत्यशोधक विवाहास मोठी उंची निर्माण केली.यावेळी विवाहानंतर वधु वरांना मान्यवरांचे हस्ते संस्थेकडून सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र व थोरसमाज सुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा रघुनाथ ढोक यांनी भेट दिली.
या विवाह प्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे,माजी आमदार कमलनानी ढोले पाटील ,माजी महापौर विठ्ठलराव लडकत,प्रशांत जगताप, वैशाली बनकर,माजी सभापती प्रभावती भूमकर,समता परिषदेच्या प्रदेश अध्यक्षा मंजिरी धाडगे,रवी सोनावणे,अंबादास गारूडकर,प्रितेश गवळी,पंढरीनाथ बनकर,नगरसेविका मनीषा लडकत,सुनिल बनकर,प्राचार्य दत्तात्रय बालसराफ,रवी चौधरी,दिलीप राऊत,बाळासाहेब रायकर,गणेश कळमकर,विठ्ठल सातव,अशोक राठी,दिलीप शेलवंटे, पत्रकार महेश जांभुळकर ,हॉटेल पथिक परिवार आणि विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.विवाहाचे सुत्रसंचालन अनिल लडकत व हनुमंत टिळेकर यांनी केले.सद्या अनेक ठिकाणी आंतरजातीय विवाह केल्याने अनेक वाईट घटना घडत असताना जांभुळकर आणि जन्नू कुटूंबियांनी आपल्या मुलांमुलीचा आंतरजातीय सत्यशोधक विवाह करून सामाजिक समतोल राखण्याचा आदर्श हजारो लोकांचे समोर मान्यवरांचे उपस्थित केला त्याबद्दल कौतुक होत होते.

