पुणे:फुले शाहु आंबेडकर एजुकेशनल अँण्ड सोशल फौंडेशन व सप्तपदी माळी वधु वर केद्रातर्फे थोरसमाजसुधारक महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे एकत्रित असलेले छायाचित्राचे दिनदार्शिका (कॅलेंडर सन 2017 चे) लालमहाल येथे जेष्ठ उदयोजक तुकाराम कानडे किशोर ढमाले प्रतिमा परदेशी यांचे हस्ते मॉं जिजाऊसाहेब यांच्या जंयती निमित्त प्रकाशित करण्यात आले. याप्रसंगी महात्मा फुळे यांच्या वेशभुषेत रघुनाथ ढोक तर नवनाथ लोढे ,सुदाम धाडगेसर ,बी.एस.माळी,रवी रासकर आदी मान्यवर उपस्थित होते. सत्यशोधक पदयात्रा संकाळी 11वाजता समताभूमी महात्मा फुले वाडा ते लालमहाल अशी काढण्यात आलीं. याप्रसंगी साऊ जिजाऊ सत्यशोधक पदयात्रेचे सहभागी नवनाथ लोढे यांनी ३ जाने,रोजी पदयात्रा नायगाव येथून सुरू करून आज २० शाळा मध्ये अनुभव सांगितले त्याबद्दल निमंत्रक प्रतिमा परदेशी ,किशोर ढमाले ,सोनावणे, यांनी फुले यांची प्रतिमा भेट दिली., मधुकर निरफराखे ,दिपक गिरमे,संतोष शिंदे,हनुमंत गायकवाड ,जिजाऊ प्रतिष्ठाण च्या प्रतिनिधी,बामसेप चे कार्यकर्तें मान्यवर उपस्थित होते.आकाश ढोक यांनी सयोजन केले.यावेळी 500 कैलेंडर भेट देण्यात आली. सत्यशोधक प्रबोधन महासभेने या कार्यात सहभाग नोंदविला