मुंबई, दि. 4 : ठाणे जिल्ह्यातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत 269 चौ. फुटांऐवजी आता 300 चौ.फुटांचे घर देणार असल्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला केली.श्री. आव्हाड म्हणाले, ठाणे येथे 8 एप्रिल 2016 पासून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे कार्यालय सुरु झाल्यापासून आतापर्यंत 19 प्रस्ताव नव्याने प्राप्त झाले आहेत. या सर्व प्रकल्पांनाही 300 चौ. फू. लागू होणार आहे. ठाणे जिल्ह्यात पुनर्वसन योजनेस विकासकांकडून आवश्यक प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री ॲड.निरंजन डावखरे, रवींद्र पाठक, प्रसाद लाड आदींनी प्रश्न उपस्थित केला होता
एसआरए योजनेंतर्गत आता 300 चौ. फुटाचे घर – गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड
Date:

