धान खरेदी केंद्राची संख्या वाढवून धान खरेदीचे योग्य व्यवस्थापन करावे – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

Date:

मुंबई, दि. ३० : धान खरेदी केंद्राची संख्या या हंगामात वाढवून धानखरेदी वेळेवर करा. धान खरेदी व धानभरडाई प्रक्रियेबाबत अंदाजित वेळापत्रक तयार करून वेळापत्रकाप्रमाणेच प्रक्रिया पार पडेल अशी खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत  राज्यात खरेदी करावयाच्या धान व भरड धान्य खरेदी पूर्व नियोजनाची मंत्रालयातील परिषद सभागृहात बैठक झाली. अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला दूदरदृश्यप्रणालीद्वारे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणचे सचिव विजय वाघमारे,महाराष्ट्र राज्य सहकारी व पणन महासंघ लिमीटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग,सर्व विभागांचे पुरवठा उपायुक्त तसेच दूरदृश्यप्रणालीव्दारे जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

श्री.भुजबळ म्हणाले, धानाची प्रतवारी व इतर बाबीसाठी शासनस्तरावर राज्यस्तरीय भरारी पथक तयार करण्यात येणार आहे. या पथकाकडून प्रत्यक्ष स्थळी भेट देवून सर्व बाबींची तपासणी केली जाईल. या पथकाला तपासणीदरम्यान गैरप्रकार आढळल्यास सर्व संबंधितावर कडक कारवाई  करण्यात येईल.पणन हंगाम 2020-2021 मध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय शासनाकडून घेण्यात आले होते. ऑनलाईन सातबारा, बाहेरील राज्यातून धान येणार नाही यासाठी राज्याच्या सिमा सिल करणे, धानाची गुणपत्ता यंत्रणेमार्फत तपासून घेणे, धानापासून तयार होणाऱ्या सिएमआरचे गुणवत्ता नियंत्रणेमार्फत गुणवत्ता तपासणी करून घेण्यात आले आहे. याप्रमाणेच आताही धान खरेदी करताना या निर्णयांची अमंलबजावणी केली जावी.

श्री.भुजबळ म्हणाले, धान खरेदी केंद्राबाबत स्थानिक यंत्रणांनी समन्वयानी काम करावे. धान खरेदी केंद्रावर कर्मचारी, ग्रेडर, वजन काटे, धान साठवणुकीसाठी गोदामे, मॉइशर मिटर या सर्व बाबीं उपलब्ध आहेत का याचीही तपासणीही केली जावी. फक्त नोंद असलेल्या शेतकऱ्यांकडूनच धान खरेदी करण्यात यावे. धानखरेदी केंद्राचे योग्य व्यवस्थापन होण्यासाठी धान खरेदी केंद्राबाबत  शासन स्तरावर एक मध्यवर्ती माहिती संकलन कार्यालय करता येईल का ? याबाबत संबंधित यंत्रणांनी चाचपणी करावी. धान खरेदी केंद्रावर प्रशिक्षित ग्रेडरची नेमणूक करावी. सर्व गोदांमाचेही योग्य व्यवस्थापन करण्यात यावे तसेच कोणताही शेतकरी धान नोंदणीपासून वंचित राहता कामा नये याचीही खबरदारी घेण्यात यावी अशा सूचनाही श्री. भुजबळ यांनी दिल्या.

मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, मिलर्स सोबत करार करताना त्यांना सर्व अटी व नियम यांची माहिती देण्यात यावी. जे मिलर्स केलेल्या करारनाम्यातील अटींचे पालन करणार नाहीत त्यांच्या सक्त कायदेशीर कारवाई करण्यात यावी मिलर्सकडून प्राप्त होणारा सिएमआर ची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी प्रशिक्षित गुणवत्ता यंत्रणेची नेमणूक करण्यात यावी. याबाबत शासन व भारतीय अन्न महामंडळ यांचे प्रशिक्षण शिबिरांचे आयोजनही करण्यात यावे जेणेकरून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती संबधित कर्मचाऱ्‍यांना देण्यात यावे जेणेकरून गोदामाचे व्यवस्थापन या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येईल. बारदानाच्या आवश्यकतेबाबत शासन स्तरावरून माहिती संकलित करावी. ही प्रक्रिया लवकर मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी.जेणेकरून बारदान व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्यात येईल अशा सूचनाही श्री.भुजबळ यांनी दिल्या.

श्री.भुजबळ म्हणाले, पणन हंगाम २०२०-२१ साठी ज्वारी, बाजरी, गहू, मका व रागी या पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र व अंदाजित उत्पादन याबाबत योग्य माहिती घेण्यात यावी. जेणेकरून केंद्र शासनास भरडधान्याच्या बाबतीतील माहिती कळविण्यात येईल. भरडधान्याची प्रत व गुणवत्ता तपासूनच खरेदी करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. अशा सूचनाही अन्न,नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनी बैठकीत दिल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...