पाणीटंचाईबाबत प्रस्तावित उपायांची अंमलबजावणी वेळेत करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Date:

पुणे, दि.12 : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची अंमलबजावणी  वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

विधानभवन येथील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत पुणे जिल्ह्याचा संपूर्ण प्रारुप आराखड्याबाबत बैठक झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, पाण्याची गरज असलेल्या प्रत्येक गावांमध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आराखड्यात नमूद प्रत्येक उपाययोजनेची विहित वेळेत अंमलबजावणी करावी. कुठेही अडचण उद्भवता कामा नये. सर्व ठिकाणी पाणीपुरवठा नियमित व्हावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

खा.गिरीश बापट म्हणाले, पाणी गरज लक्षात घेत गावनिहाय नियोजन होणे आवश्यक आहे. गावातील पाणी वितरण व्यवस्था व्यवस्थित पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जलजीवन मिशन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत पुणे जिल्ह्याच्या संपूर्ण प्रारुप आराखड्याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

यावेळी पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

किडनी विक्री प्रकरणातील सावकरांवर कधी कारवाई करणार? – वडेट्टीवार

मुंबई- विदर्भातील शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकवी लागल्याचा प्रकार...

DGCA कडून विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न:अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार...

घरकुल लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर मिळाली नाही,जनाची नाही तर मनाची ठेवा – वडेट्टीवार

मुंबई- राज्यातील घरकुल योजनेतील घरं मंजूर होऊनही गेल्या तीन...

अमेरिकेत हिमवादळामुळे 11 हजार विमानांची उड्डाणे रद्द:5 लाख घरांची वीज गेली, 153 वर्षांत पहिल्यांदाच वर्तमानपत्र छापले जाऊ शकले नाही

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेत जोरदार वाऱ्यांमुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे विमानतळावरील धावपट्ट्या...