पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी यांची समन्वय समिती – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Date:

मुंबई : पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक निधीची उपलब्धता करणे, विविध उपाययोजना करणे याबरोबरच या कामाच्या समन्वयासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पंचगंगेच्या प्रदूषणासाठी कारणीभूत असणाऱ्या, सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता ते पंचगंगेत सोडणाऱ्या, नदी प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करण्यात यावी, त्यांना थेट टाळे लावण्यात यावे व त्यांनी नियमांची पुर्तता केल्यानंतरच टाळे उघडण्यात यावे, अशा सक्त सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलीक, आमदार प्रकाश आबीटकर, माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार सुजित मिणचेकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातून जिल्हाधिकारी दौलत देसाई, मनपा आयुक्त डाॕ कादंबरी बलकवडे, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदी वरिष्ठ अधिकारी ऑनलाईन प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शासन कार्यवाही तर करेलच, पण त्याचबरोबर ज्यांच्यामुळे हे प्रदूषण होते त्यांचीही ते रोखण्यासाठी जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. नदी परिसरातील कोल्हापूर महापालिका, इतर नगरपालिका, गावे, इचलकरंजीतील वस्त्रोद्योग युनिटस्, एमआयडीसी आदी ठिकाणांवरुन नदीचे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसंदर्भातील सविस्तर आराखडा सादर करण्यात यावा. यासाठी आवश्यक निधी शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल. पंचगंगा परिसरातील जे कारखाने नियमांचे उल्लंघन करुन नदी प्रदूषणास कारणीभूत ठरतात त्यांना थेट टाळे लावण्याची कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी. प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची त्यांनी पूर्तता केल्यानंतर आणि कारखान्यात तशी यंत्रणा बसविल्यानंतरच हे टाळे उघडण्यात यावे, अशा कडक सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आंदोलन करणाऱ्या ज्या आंदोलनकर्त्यांवर थेट सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नासारखे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत ते मागे घेण्यासंदर्भात सहानुभुतीपूर्वक विचार करण्यात येईल, असेही श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, देशातील तथा राज्यातील बऱ्याच नद्या प्रदूषित आहेत. पण पंचगंगेच्या बाबतीत मात्र हे प्रदूषण तीव्र असल्याचे दिसते. त्यामुळे नदीतील मासे मरुन ते पाण्यावर तरंगण्यासारख्या गंभीर घटना घडत आहेत. यासाठी पाण्यातील नेमके कोणते रासायनिक प्रदूषण, विषारी घटक कारणीभूत ठरले ते निश्चित करुन ते रोखण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना करणे आवश्यक आहेत. या नदीच्या प्रदूषणासंदर्भात थर्ड पार्टी ऑडीट करणे आवश्यक आहे. पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण विभागामार्फत दर महिन्याला नियमित बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. एमआयडीसी आणि एमपीसीबी यांच्या समन्वय समितीने वेळोवेळी आढावा घेऊन दर महिन्याच्या ५ तारखेला त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करावा, अशा सूचना मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले की, पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण, गावांमधील सांडपाणी व्यवस्थापन आदींसाठी गावांमध्ये ज्या यंत्रणा बसविणे नियोजित केले जाईल त्याचा देखभाल दुरुस्तीचा किंवा वीजबिलाचा बोजा संबंधित गावांवर पडू नये. यासाठी पंचगंगा नदीच्या प्रदूषण नियंत्रणासाठीचा गावनिहाय आराखडा तयार करताना निश्चित नियोजन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी नदीचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात विविध उपाययोजना सुचविल्या आणि सूचना केल्या. कोल्हापूर मनपा क्षेत्रातील सांडपाणी, नदी क्षेत्रातील इतर नगरपालिका आणि १७४ गावे, एमआयडीसी, इचलकरंजीतील वस्त्रोद्योग युनिटस् आदींमधून होणारे नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी साधारण २२० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे, असे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गावनिहाय आणि पाईंटनिहाय आराखडा तयार करण्यास सांगितले आहे, असे त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

5,000रु. पर्यंतच्या यूपीआय व्यवहारांसाठी फिंगरप्रिंट किंवा चेहरा ओळखीद्वारे पेमेंट प्रमाणीकरणाची सुविधा सुरू

मुंबई: आयसीआयसीआय बँक ने iMobile या बँकेच्या मोबाईल बँकिंग सुविधेद्वारे यूपीआय व्यवहारांसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरणाची अंमलबजावणी जाहीर केली आहे. या सुविधेमुळे  5,000 रु. पर्यंतचे व्यवहार चेहरा ओळख किंवा फिंगरप्रिंट प्रमाणीकरणाद्वारे अधिकृत करू शकत असल्यामुळे ग्राहकांचा अनुभव अधिक सुधारतो. या नवीन सुविधेमुळे या मर्यादेपर्यंतच्या व्यवहारांसाठी यूपीआय PIN मॅन्युअली टाकण्याची गरज राहत नाही. बायोमेट्रिक्स सादर होत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी ‘शोल्डर-सर्फिंग’चा धोका कमी होतो आणि जलद पेमेंट्स आणि सुरक्षितता असे दुहेरी फायदे मिळतात. ग्राहक पिअर टू पिअर  पैसे हस्तांतरण, दुकानातील पेमेंटसाठी QR स्कॅन करणे किंवा ऑनलाइन पेमेंट्स अशा यूपीआय व्यवहारांना त्यांच्या बायोमेट्रिक्सद्वारे अधिकृत करू शकतात. 5,000 रु. पेक्षा जास्तीच्या व्यवहारांसाठी ग्राहकांना पेमेंट अधिकृत करण्यासाठी त्यांचा सध्या वापरत असलेला  यूपीआय PIN आवश्यक असेल. आयसीआयसीआय बँकेचे प्रवक्ते म्हणाले, “आमच्या ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे हे नेहमीच आमच्या कामकाजाच्या केंद्रस्थानी राहिले आहे आणि आमच्या ग्राहकांना प्रगत डिजिटल उपायसुविधा पुरविण्यावर आमचा विश्वास आहे. बायोमेट्रिक प्रमाणीकरण सादर करणे हे सध्याच्या नियामक मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत आहे आणि अधिक सुरक्षित व अखंड पेमेंट अनुभव सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. iMobile वर डिव्हाइस-स्तरीय बायोमेट्रिक पडताळणीचा उपयोग करून सुलभ वापर सुनिश्चित करत आम्ही व्यवहारांची सुरक्षितता अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करतो. ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार आणि सोयीप्रमाणे PIN-आधारित आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण यापैकी निवड करण्याची लवचिकताही उपलब्ध आहे.” ही सुविधा Android – v30 आणि IOS – v28.2 या iMobile अॅपच्या अत्याधुनिक व्हर्जन्सवर उपलब्ध आहे. Android वापरकर्ते फिंगरप्रिंटद्वारे व्यवहार अधिकृत करू शकतात तर IOS वापरकर्ते फेस रेकग्निशन म्हणजेच चेहरा ओळखीद्वारे हे करू शकतात. iMobile वापरकर्ते काही सोप्या कृतीद्वारे बायोमेट्रिक ऑथेंटिकेटर सहज सक्रिय करू शकतात: ·         iMobile अॅपमध्ये लॉग इन करा ·         UPI पेमेंट्सवर क्लिक करा आणि UPI सेटिंग्स निवडा ·         बायोमेट्रिक सक्षम करण्यासाठी खाते क्रमांक निवडा ·         ‘Use biometric for payments’ निवडा आणि ‘proceed’ वर क्लिक करा ·         पडताळणीसाठी आपला UPI PIN टाईप करा ·         डिव्हाइस-स्तरीय बायोमेट्रिक डेटा प्रमाणीकरण करा

सह्याद्री हॉस्पिटलचा न्यूरोसर्जरीत जागतिक विक्रम:5 वर्षांत 750 हून अधिक ‘एमव्हीडी’ शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे- सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने न्यूरोसर्जरी (मेंदू शस्त्रक्रिया) क्षेत्रात...

दिल्ली हायकोर्टात व्हर्च्युअल सुनावणीत अश्लील व्हिडिओ हॅकर्स ने चालविला, गाणीही वाजली, मुख्य न्यायमूर्तींनी सुनावणी थांबवली

नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयात बुधवारी व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान अश्लील...