वाहतूक नियमांचे पालन करुन सुरक्षित महाराष्ट्र घडवूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Date:

रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

 

मुंबई : राज्यात वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षित महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळावेत. स्वत:चा आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान एक आठवडा न पाळता वर्षभर वाहतुकीच्या नियमांसाठी दक्ष राहून शून्य टक्के अपघाताकडे लक्ष देऊन सुरक्षित महाराष्ट्र घडवूया, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

जमशेद भाभा थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉईंट येथे परिवहन विभाग, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य व मुंबई पोलीस वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 31 वा राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह 2020 चे उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिवहनमंत्री ॲड.अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधानसभा सदस्य राहुल नार्वेकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, पोलीस यंत्रणा नेहमीच आपल्या युनिफॉर्ममध्ये कर्तव्य बजावत असतात. म्हणून सामान्य जनता विविध उत्सव-सणांचा आनंद घेऊ शकते. या आनंदाची खरी मानकरी ही पोलीस यंत्रणाच आहे. वाहतुकीचे नियम शाळा, महाविद्यालय स्तरावर मुलांना शिकवणे आवश्यक आहे. मुलांना नियम समजल्यानंतर ते आपल्या कुटुंबियांना समजावून सांगतात. त्यासाठी मुलांना सुरक्षिततेचे नियम सांगणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रस्त्यावर वाहतूक पोलीस जरी दिसत नसले तरी पोलिसांचे लक्ष आपल्यावर असते. वाहन चालविताना नेहमी नियमांचे पालन करावे.

सन 2005 साली चीनचे अपघाताचे प्रमाण 94 हजार आणि भारताचे 98 हजार होते. चीनचे आता 45 हजारांवर आहे तर भारताचे 1.50 लाखांवर आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी ‘आपली सुरक्षा ही कुटुंबांची सुरक्षा’ समजून शून्य टक्के अपघाताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवावा, असे आवाहनही श्री.ठाकरे यांनी यावेळी केले.

परिवहनमंत्री ॲड. परब म्हणाले, माणसाचे जीवन हे मेणबत्तीसारखे असते. एखादा अपघातसुद्धा माणसाची ज्योत विझवून कुटुंबावर अंधार पसरवितो. वाहतुकीसंबंधी सर्व घटकांनी आपल्या कर्तव्याचे पालन करावे. गेल्या वर्षभरात 12 हजार 556 लोक केवळ रस्ते अपघातात मृत्यू होणे हा आकडा छोटा नाही. याचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपक्रमांतून वाहतूक नियमांची जनजागृती करणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, प्रसार माध्यम, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय यांच्या माध्यमातून जनजागृती करुन पुढील वर्षभरात 10 टक्क्यांपेक्षा अधिक अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करुन शून्य टक्के अपघाताचे उद्दिष्ट समोर ठेवून सर्वांनी कार्य करावे.

राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले, जीवन हे महत्त्वाचे आहे. इंटरनेटचा वेग 4 जी वरुन 5 जी झाला म्हणून आपण वाहन चालवत असताना वाहनाची गती वाढवू नये. वाहतूक नियमांचे पालन करावे. नगरविकास विभागाकडून विकास नियंत्रण नियमावली तयार करताना परिवहन विभागाचा समावेश करुन विकास आराखडा तयार करावा. ट्रॅफिक सिग्नल यंत्रणेवर अधिक लक्ष द्यावे. त्यासाठी विशेष निधीची तरतूद करावी

कार्यक्रमाला परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) मधुकर पांडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रायगड, वाशिम, ठाणे या जिल्ह्याच्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा सत्कार करण्यात आला. कौतुकास्पद काम करणारे म्हणून तेजस्विनी हेगडे, गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, हार्दिक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्या चालकांनी विना अपघात 25 वर्ष सेवा केली त्यांचाही सत्कार करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...