Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कोविड-१९ च्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधांच्या पुरवठ्यासाठी दक्षता

Date:

अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे विशेष प्रयत्न

मुंबई, ; कोविड-19 या कोरोना  विषाणूच्या आजाराच्या उपचारासाठी लागणारी औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावी त्यांचा तुटवडा भासू नये यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे विशेष लक्ष ठेवून आहेत. सातत्याने अधिकाऱ्यांच्या, पुरवठादारांच्या बैठका घेऊन ते आढावा घेत आहेत. तर रुग्णालय, फार्मसी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करीत आहेत. कोविड -१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा काळाबाजार होणार नाही यासाठीदेखील विशेष दक्षता घेण्यात येत आहे.

कडक कारवाईचे निर्देश

कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे  प्रामुख्याने रेमडेसिवर [Remdesivir 100 mg Inj] व टोसीलीझुमॅब  (Tocilizumab Inj) या औषधांची बाजारात अवाजवी दर आकारणी व साठेबाजी होत नसल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी खात्री करावी. असे आढळून आल्यास संबधितांविरुध्द कडक कारवाई करण्याचे सक्त निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत.

या दोन्ही औषधाचा राज्यात तुटवडा होत असून काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी येत होत्या, या पार्श्वभूमीवर डॉ.  शिंगणे यांनी दोन्ही औषधांच्या उत्पादक व वितरक तसेच अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत उत्पादक व वितरक कंपन्यांनी त्यांचे वितरक राज्यभरात वाढवावेत तसेच उत्पादन व आयात वाढवावी  अशा सूचना डॉ. शिंगणे यांनी दिल्या आहेत.

रेमडेसिवीर [Remdesivir 100 mg Inj] व टोसीलीझुमॅब  (Tocilizumab Inj) या दोन औषधांचे उत्पादक / आयातदार फक्त दोनच कंपन्या आहेत. त्यांचे उत्पादन  राज्याबाहेर होते. रेमडेसिवीरचे उत्पादन हेटेरो हेल्थकेअर, हैद्राबाद येथे  होते. तर सिपला कंपनी गोव्यात उत्पादन करते. टोसीलीझुमॅबची आयात मे.रोश कंपनी करते तर मे.सिपला ही कंपनी वितरण करते. 

पर्यायी औषधांचा सल्ला

टोसीलीझुमॅब (Tocilizumab Inj) चे पर्यायी औषध ईटियोझुलॅब Itiozulmab हे मे. बायोकॉन (Biocon) या कंपनीने बाजारात आणले आहे. टोसीलीझुमॅब(Tocilizumab Inj) ची आयात मर्यादित असल्याने रुग्णाची हेळसांड होऊ नये यासाठी उपचार करताना ईटियोझुलॅब (Itiozalmab) या पर्यायी औषधाचा वापर डॉक्टरांच्या सल्याने करावा असे ही डॉ. शिंगणे यांनी सांगितले आहे.

उपलब्ध औषधांची यादी प्रसिद्ध

महाराष्ट्रात मिळणाऱ्या या औषधाचा तपशील तसेच वापर / विक्री चे तपशील घेण्याबाबत डॉ. शिंगणे यांनीअधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. दर दिवशीच्या तपशीलावर ते स्वत: नजर ठेवून आहेत. तसेच गरजू रुग्णांना औषध कुठे उपलब्ध आहे याबाबत वितरकांची यादी प्रसिध्द केली असून औषधे उपलब्ध करुन देण्यास मदत करण्याचे काम अन्न व औषध प्रशासन विभागाकडून केले जात आहे.

प्रत्यक्ष भेट आणि तपासणी

गेल्या आठ दिवसात जवळपास 10-11 रुग्णालयातील औषधी वितरण केंद्रांना डॉ. शिंगणे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन काळाबाजार किंवा जास्त किंमत आकारणी बाबत स्वत: चौकशी केली.  प्रत्येक रुग्णालयातील फार्मसीमध्ये Tocilizumab या इंजेक्शनची विक्री एम आरपीवर न करता फक्त माफक नफा ठेवून ग्राहकांना / रुग्णांना करावी असे आवाहन केले. ज्याला प्रतिसाद देऊन मुंबई व ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पीटल, भायखळा फार्मसी, मे.एस.के.एजन्सीज व सैफी रुग्णालय यांच्याकडून Tocilizumab माफक दरात विक्री केली जाते आहे.  उत्पादक / आयातदार जास्तीत जास्त साठा जास्त रुग्ण असलेल्या क्षेत्रात उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

काळाबाजार प्रकरणी एफआयआर

रेमडीसीवर या औषधाची काळाबाजारी करण्याचे एक प्रकरण आढळून आले असून संबधिताविरुध्द पोलिसात प्रथम खबर अहवाल नोंदविण्यात आला आहे व दोन आरोपीस अटक करण्यात प्रशासन व पोलिसांना यश मिळाले आहे. डॉ. शिंगणे  स्वत: पूर्ण बारकाईने परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.

उपलब्ध औषधांचा साठा

राज्यात औषधांच्या साठ्याचा नियमित आढावा घेण्यात येत आहे. आज दि.१७.७.२०२० पर्यंत  असलेला साठा पुढील प्रमाणे आहे.

नवीनउत्पादनसुरुऔषधपुरवठ्यातवाढ

येत्या आठवडयात मे.मॉयलान ही कंपनी रेमडेसीवीर इंजेक्शन बाजारात आणणार आहे तसेच मे.हेटेरो हेल्थकेअर, गुजरात येथील नवसारी येथे उत्पादन लवकरच सुरु करणार आहे. मे. सिपला ही सुध्दा गुजरात येथे उत्पादन सुरु करण्याचा प्रयत्नात आहे. त्यामुळे वरील औषधांच्या पुरवठयात वाढ होणार आहे.

औषधे वैद्यकीय सल्ल्याने घ्यावीत

तुटवडा असलेल्या या दोन्ही औषधाचा वापर आयसीएमआरच्या सूचना विचारात घेऊन वैद्यकीय सल्ल्याने अत्यावश्यक / गंभीर रुग्णासाठी करण्यात यावा अशी सूचना डॉ. शिंगणे यांनी आरोग्य मंत्री, राजेश टोपे यांना केली आहे.  त्यांनी सदर बाब डॉक्टरांच्या टास्क फोर्स मार्फत अमलात आणण्यात येईल असे आश्वासित केले आहे.

या औषधाच्या काळाबाजारी बाबत काही माहिती असल्यास ती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक  1800222365 वर देण्यात यावी, असे आवाहनही डॉ. शिंगणे यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खडकवासल्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर विधानसभेत आ. तापकीरांची लक्षवेधी –

पुण्यासाठी स्वतंत्र ट्रॅफिक प्लॅनर पद व समन्वय समिती स्थापनेचे...

चंद्रकांतदादा पाटील यांची वाचनप्रेमी कोथरुडकरांसाठी आनंदाची बातमी

कोथरुड मतदारसंघातील वाचकांसाठी विशेष सवलत योजना पुणे-तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या...

निगडी ते चाकण व्हाया वाकड मेट्रो ‘डीपीआर’ मंजुरीसाठी आ. शंकर जगताप यांच्याकडून मागणी!

चापेकरवाडा पुनर्विकास प्रकल्प; जलनिस्सारण प्रकल्प, जकात अभय योजनेबाबत मांडल्या...

कायदेशीर बाजु पुर्ण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा विस्तार पूर्ण करणार!

नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या (पुणे) विस्तारीकरणासाठी...