पारलेतील लोकमान्य सेवा संघाच्या श्री गणेशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी घेतले दर्शन

Date:

मुंबई, दि. 7 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पारले येथील लोकमान्य सेवा संघाच्या श्री गणेशाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. पूजेनंतर प्रधानमंत्री मोदी नागरिकांच्या “..मोदी…मोदी..” च्या घोषणांना प्रतिसाद देण्यासाठी थेट मोटारीत न बसता चालतच संघाच्या बाहेर आले..आणि त्यांनी .”..अभिवादनाला हात जोडून, हात उंचावून प्रतिसाद देताच परिसर ‘..भारत माता की जय !च्या घोषणांनी दणाणून गेला.

पारले येथील लोकमान्य सेवा संघाच्या श्री गणेश उत्सवातील श्री गणेशाचे विधीवत् पूजन केले. त्यानंतर संघाच्या सभागृहातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रधानमंत्री मोदी यांच्या समवेत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले, तसेच लोकमान्य टिळक यांना अभिवादन केले.

संघाने उभे केलेल्या पु.ल. गौरव दालनास प्रधानमंत्री मोदींनी भेट दिली. याठिकाणी पु.लंच्या साहित्यकृती, काही दस्तऐवज, लेखन-सामुग्री आणि वस्तू, छायाचित्रांचे जतन करण्यात आले आहे. या मौलिक संग्रहाची प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी आस्थेने माहिती घेतली. त्यांनी अतिथी हस्ताक्षर पुस्तिकेत अभिप्रायही नोंदविला.

“..पु.ल. म्हणजे हसू..मग तुम्ही या दालनात आल्यावर हसता ना?” असा मिश्किल प्रश्नही त्यांनी संघाच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांना केला.

यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार मंगलप्रभात लोढा, पराग अळवणी आदी उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे, दिपक घैसास, उदय तारदाळकर यांनी स्वागत केले तसेच सेवा संघ आणि पु.ल. देशपांडे गौरव दालनाची माहिती दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अमेरिका इस्त्राईल इराण युद्ध संपून शांतता निर्माण व्हावी: हर्षवर्धन सपकाळ.

हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली इराणचे कॅान्सुल जनरल सईद रझा...

घरगुती गॅससाठी आता ‘ई-केवायसी’ कडे दुर्लक्ष केल्यास कनेक्शन होऊ शकते रद्द, एजन्सीत न जाता घरबसल्या अशी पूर्ण करा प्रक्रिया

मुंबई-घरगुती गॅस (LPG) वापरणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांसाठी केंद्र सरकारने ई-केवायसी...