Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कोरोनाचे आज १२३० नवीन रुग्ण;राज्यात एकूण रुग्ण २३ हजार ४०१

Date:

४७८६ रुग्ण बरे होऊन घरी
-आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.११: राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २३ हजार ४०१ झाली आहे. आज १२३० नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५८७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ४७८६ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख १८ हजार ९१४ नमुन्यांपैकी १ लाख ९३ हजार ४५७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २३ हजार ४०१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. (प्रयोगशाळा नमुन्यांचे आकडे आय सी एम आर पोर्टलप्रमाणे अद्ययावत करण्यात आले आहेत.)
राज्यात २ लाख ४८ हजार ३०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५ हजार १९२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ३६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ८६८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २०, सोलापूर शहरात ५, पुण्यात ३ , ठाणे शहरात २, अमरावती जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, नांदेड शहरात १, रत्नागिरी मध्ये १ तर वर्धा जिल्ह्यात १ मृत्यू झाला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशमधील एक मृत्यू मुंबई येथे झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २३ पुरुष तर १३ महिला आहेत. आज झालेल्या ३६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ३६ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये ( ७५ टक्के ) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: १४,५२१ (५२८)
ठाणे: १२५ (२)
ठाणे मनपा: ९२७ (१०)
नवी मुंबई मनपा: ८९८ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: ३६६ (३)
उल्हासनगर मनपा: ३०
भिवंडी निजामपूर मनपा: ३२ (२)
मीरा भाईंदर मनपा: २१४ (२)
पालघर: ३७ (२)
वसई विरार मनपा: २४९ (१०)
रायगड: १२३ (१)
पनवेल मनपा: १३९ (२)
ठाणे मंडळ एकूण: १७,६६१ (५६६)
नाशिक: ६०
नाशिक मनपा: ४०
मालेगाव मनपा: ५९५ (३४)
अहमदनगर: ५४ (३)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे: ९ (३)
धुळे मनपा: ४५ (३)
जळगाव: १४५(१२)
जळगाव मनपा: ३५ (७)
नंदूरबार: २२ (२)
नाशिक मंडळ एकूण: १०१५ (६४)
पुणे: १६६ (५)
पुणे मनपा: २४७८ (१४९)
पिंपरी चिंचवड मनपा: १४७ (४)
सोलापूर: ९
सोलापूर मनपा: २८७ (१६)
सातारा: १२१ (२)
पुणे मंडळ एकूण: ३२०६ (१७६)
कोल्हापूर: १३ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३३
सांगली मिरज कुपवाड मनपा: ४ (१)
सिंधुदुर्ग: ६
रत्नागिरी: ४२ (२)
कोल्हापूर मंडळ एकूण: १०४ (४)
औरंगाबाद:९३
औरंगाबाद मनपा: ४९१ (१४)
जालना: १४
हिंगोली: ६०
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ६६० (१५)
लातूर: २६ (१)
लातूर मनपा: ५
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ४
नांदेड मनपा: ४१ (४)
लातूर मंडळ एकूण: ८० (५)
अकोला: १८ (१)
अकोला मनपा: १४४ (१०)
अमरावती: ५ (२)
अमरावती मनपा: ७८ (११)
यवतमाळ: ९७
बुलढाणा: २५ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: ३६८ (२५)
नागपूर: २
नागपूर मनपा: २५७ (२)
वर्धा: १ (१)
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: २६६ (३)
इतर राज्ये: ४१ (१०)
एकूण: २३ हजार ४०१ (८६८)
(टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या ३०८ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १२५६ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२ हजार २७ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५३.७१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे

 

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...