Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

असा होता आठवडा……

Date:

(दि.२६ एप्रिल ते  २ मे  २०२० पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा. कोरोना अपडेट्स)

२६ एप्रिल २०२०

  • राज्यात ४४० नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ८०६८, कोरोना बाधित ११८८ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून जनतेशी संवाद. प्रमुख मुद्दे – कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागात २० एप्रिलनंतर काही व्यवहार सुरु करण्याला अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मान्यता, शेतीची कामे, शेतमाल तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरु, कापूस खरेदी केंद्रे सुरु, फळवाहतूक सुरु, फळे घरपोच देण्याचा प्रयत्न,  जिल्ह्यांमधील परिस्थितीचा अभ्यास करून ३ मे नंतर काही मोकळीक देता येईल का याचा निर्णय घेणार, आपल्या स्वास्थ्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकून काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार पोलीस हेच आपले खरे देव, त्यांचा आदर ठेवणे हीच खरी देवभक्ती, ८० टक्के लोकांमध्ये विषाणुची लक्षणे दिसून येत नसून एकमेकांपासून दूर राहणे गरजेचे,  २० टक्के लोकांमध्ये हायरिस्क रुग्णांची संख्या अधिक, लॉकडाऊनमुळेच  विषाणुच्या गुणाकाराचा वेग रोखण्यात यशस्वी, मृत पोलीसांच्या कुटुंबाना सर्व मदत, आरोग्य सुविधांमध्ये वाढ.
  • लॉकडाऊनच्या काळात दि. २२ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत ७२,६९८  गुन्हे दाखल, १५,४३४ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ७४ लाख ४३ हजार ३९४ रुपयांचा दंड .
  • आतापावेतो स्वस्त धान्य दुकानातून 65 लाख 55 हजार 480 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री छगन भुजबळ यांची माहिती.

२७ एप्रिल २०२०

  • पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या मार्फत चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती.
  • अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज योजनेतून व्यवसायात यशस्वी झालेल्या तरुणांची कोरोना संकटग्रस्तांना मदत
  • महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सदस्यांसोबत, लॉकडाऊननंतर उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे उद्योगमंत्री श्री. देसाई यांचा संवाद. राज्यभरातील 250 पेक्षा अधिक उद्योजक, व्यापाऱ्यांचा सहभाग. कोरोनामुळे व्यापार व उद्योगांना जाणवणाऱ्या अडचणी, टाळेबंदी संपल्यानंतर उद्योग सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी, त्यावर कराव्या लागणाऱ्या उपाय योजनांवर चर्चा.
  • लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर विविध सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करु नये, अशी  सहकार मंत्री श्री बाळासाहेब पाटील यांची मागणी.
  • स्वस्त धान्य दुकानांमधून 1 ते 27 एप्रिल 2020 या सत्तावीस दिवसात  1 कोटी 54 लाख 18 हजार 966 शिधापत्रिका धारकांना 66 लाख 31 हजार 950 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.
  • लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध एकाच दिवसात १०३७ गुन्हे दाखल.
  • निराधार, ज्येष्ठ, दिव्यांगांना तीन महिन्यांचे अनुदान आगाऊ मिळणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर ‘सामाजिक न्याय विभागाला 1 हजार 273 कोटी वितरीत.
  • टाळेबंदीपूर्वी खरेदी केलेल्या वनोपजावरील व्याज व शिक्षार्थ जमीन भाडे माफ करण्याचा वनमंत्री श्री संजय राठोड यांचा निर्णय. काष्ठ व्यापाऱ्यांना दिलासा.
  • लॉकडाऊननंतर उद्योग विभागामार्फत काही अटी व शर्थीसह दि. २० ते २७ एप्रिल दरम्यान १३ हजार ४४८ उद्योगांना परवाने जारी.

मंत्रिमंडळ निर्णय

  • दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून २ महिन्याकरिता ४ कोटी लिटर दुधाचे रुपांतर दूध भुकटीत करण्यास मान्यता, ही योजना राबविण्यासाठी १२७ कोटी रुपये आकस्मिकता निधीद्वारे खर्च करणार.
  • कोविडच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गाला दिलासा, जीएसटी कायद्यात आवश्यक सुधारणा करणार.
  • कोविडमुळे सहकारी संस्थांच्या बाबतीत अधिनियमात सुधारणा.
  • महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मधील पात्र परंतु सध्या निधी अभावी लाभ मिळू न शकलेल्या खातेदारांना बँकांनी थकबाकीदार न मानता खरीप २०२० साठी नवीन पीक कर्ज द्यावे अशी विनंती, केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतीय रिझर्व्ह बँकेस करण्याचा निर्णय.
  • नांदेड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडणुका कोविडच्या संक्रमणामुळे ३ महिने किंवा राज्य शासन ठरवेल त्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय.
  • लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागामार्फत ३०१ गुन्हे दाखल.

२८ एप्रिल २०२०

  • कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि त्यासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणासाठी दि. २९ व ३० एप्रिल रोजी कामकाज बंद राहणार.
  • स्वस्त धान्य दुकानांमधून आतापावेतो 1 कोटी 54 लाख 71 हजार 728 शिधापत्रिका धारकांना 67 लाख 14 हजार 740 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती.
  • मुख्यमंत्री सहाय्यता निधीला  टिकटॉक कंपनीकडून ५ कोटींची तर, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांकडून १ कोटीची मदत, आतापर्यंत २८५ कोटींची मदत जमा.
  • कोरोनासाठी त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे राज्यात स्थापन, सध्या तीन वर्गवारीतील १६७७ उपचार केंद्रे कार्यरत, त्यामध्ये १ लाख ७६ हजार ३४७ विलगीकरण (आयसोलेशन) खाटांची संख्या, ७२४८ अतिदक्षता (आयसीयू) खाटांची उपलब्धता, तीन हजार व्हेंटीलेटर्स, ८० हजाराच्या आसपास पीपीई किटस, २ लाख ८२ हजार एन ९५ मास्क उपलब्ध असल्याची, आरोग्यमंत्री  श्री राजेश टोपे यांची माहिती.
  • कोरोनामुळे खरीप हंगामासाठी खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर देण्याचे कृषी विभागाचे नियोजन, ३१ मे पूर्वी पुरवठा करण्याचे कृषिमंत्री श्री दादाजी भुसे यांचे निर्देश.
  • ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना २०२० – २१ या आर्थिक वर्षात करवसुलीवर आधारीत वेतन न देता त्यांना किमान वेतन देण्याचा ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचा निर्णय.
  • विदर्भातील धान खरेदी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत असलेल्या मुदतीत केंद्रशासनाच्या वतीने ३० एप्रिल पर्यंत वाढ, ३० एप्रिल पर्यंत धान विक्री करणाऱ्या या धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यात येणार असल्याची, अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती.
  • देहविक्रयातील महिलांना ‘रेशन’, आणि वैयक्तिक स्वच्छता साधनांचा पुरवठा करण्यासाठी महिला व बालविकास मंत्री मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा पुढाकार. स्वयंसेवी संस्थांची मदत.
  • शासनाच्या गट ‘ड’ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा, मे महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत राबवण्यात येत असलेल्या ‘कम्युनिटी किचन’ या उपक्रमात सुसूत्रता यावी, खाद्यपदार्थांच्या वाहतुकीसाठी लागणारा वेळ वाचावा, लोकांना ताजे अन्न मिळावे यासाठी प्रभागनिहाय कम्युनिटी किचन सुरु करण्याचे मुंबई शहरचे पालकमंत्री श्री. अस्लम शेख यांचे महानगरपालिकेस निर्देश.
  • भारतीय निर्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत उद्योगमंत्र्यांचा संवाद, देखभाल दुरूस्तीसाठी कार्यालये उघडण्याच्या मागणीवर  उच्चाधिकार समिती निर्णय घेणार असल्याची श्री देसाई यांचे सुतोवाच.
  • लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागामार्फत  ३०७ गुन्हे दाखल.
  • स्वस्त धान्य दुकानांमधून आतापावेतो 1 कोटी 54 लाख 71 हजार 728 शिधापत्रिका धारकांना 67 लाख 14 हजार 740 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती.

९ एप्रिल २०२०

  • ऊसतोडणी करून बीड जिल्ह्यात परतलेल्या ऊसतोड मजुरांना २८ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीसाठी जीवनावश्यक किराणा साहित्य मोफत वाटप करण्याचा निर्णय,  बीड जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून यासाठी प्राथमिक स्वरूपात १ कोटी ४३ लाख रुपये निधी मंजूर, पालकमंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश.
  • केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद  व केंद्रीय  माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी राज्यमंत्री श्री.सतेज पाटील यांचा राज्य सरकारच्या वतीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद, कोरोनामुळे भविष्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात घरातूनच काम करणे (वर्क फ्रॉम होम) ही नित्याची बाब होणार असल्याने माहितीचे संरक्षण, सुरक्षा, चांगले इंटरनेट नेटवर्क यांची पूर्तता करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याची श्री पाटील यांची सूचना.
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्था अधिक बळकट करण्यात आली असून नागरिकांना शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या धान्याच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या शंका निरसित करण्याच्या दृष्टीने हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित,     नि:शुल्क क्रमांक -1800224950, बी.एस.एन.एल/एम.टी.एन.एल. (ग्राहकांकरीता ) – 1967/ 022-23720582/ 022-23722970/ 022-23722483/ 022-23721912. पुढील क्रमांक कोविड 19 कालावधी प्रर्यत कार्यरत राहतील. 022-22023107/ 022-22026048
  • लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते २८ एप्रिल या कालावधीत ८३,१५६  गुन्हे दाखल, १६,८९७ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ९४ लाख रुपयांचा दंड.

३० एप्रिल २०२०

  • कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांच्या रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी साथरोग नियंत्रण कायद्यान्वये आदेश जारी. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश – कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसेच महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार  द्या, उपचाराविना रुग्णांना परत पाठवू नका,  अन्य कुठलेही आजार नसलेल्या आणि कोविड १९ लक्षणे नसलेल्या परंतु कोविड १९  पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना कोरोना निगा केंद्रांमध्ये (कोविड केअर सेंटर) पाठवा. मुंबई महानगरातील रुग्णवाहिकांचे नियंत्रण मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडून करण्यात यावे. कुठलाही रुग्ण मग तो कोरोना संशयित असो वा अन्य आजाराने ग्रासलेला असो, त्याची अपघात विभागात किंवा तपासणी केंद्रामध्ये तपासणी करा. जागेच्या उपलब्धतेनुसार रुग्णांच्या तपासणीकरिता स्वतंत्र व्यवस्था निर्माण करून किंवा विलगीकरणाची सोय करून तपासणी करा. रुग्णांची तपासणी, त्याला अन्यत्र हलविणे, दाखल करून घेणे आणि घरी सोडणे याबाबत आरोग्य सेवा संचालकांनी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करावी, उपलब्ध खाटांच्या अचूक व्यवस्थापनासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल केल्या जाणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मुंबई महापालिकेच्या २४ तास कार्यरत आपत्ती व्यवस्थापन विभागाकडूनच विशिष्ट क्रमांक देण्यात यावा, त्याशिवाय रुग्णाला दाखल करू नका. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णालय प्रशासनाने अर्ध्या तासाच्या आत मृतदेह वॉर्ड मधून हलविण्याबाबत कार्यवाही करावी .
  • लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी कार्यपद्धती निश्चित, सर्व जिल्हाधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती. मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर, महिला बाल विकास प्रधान सचिव आय.ए कुंदन, संचालक , आपत्ती व्यवस्थापन अभय यावलकर यांच्यावर जबाबदारी, संपर्क – ०२२-२२०२७९९०, ०२२-२२०२३०३९ ईमेल- controlroom@maharashtra.gov.in
  • कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर यवतमाळ जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या नोंदणी कार्ड  नूतनीकरणाची अट शिथिल  करण्याची वने, भूकंप पुनर्वसन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांची  मागणी.
  • लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागामार्फत  राज्यात ३३३ गुन्हे दाखल.
  • स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिल महिन्यात 1 कोटी 56 लाख 2 हजार 434 शिधापत्रिका धारकांना 69 लाख 16 हजार 722 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती.
  • कोटा येथून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास सुरु, एसटी महामंडळाच्या बसेस रवाना, विद्यार्थ्यांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार.
  • आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री विजय वडेट्टीवारांच्या पुढाकारातून आंध्रप्रदेश व तेलंगणात अडकलेले मजूर  आणि परराज्यांमध्ये अडकलेले स्थपर्यटक आणि विद्यार्थी स्वगृही परतणार.
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत उन्हाळी २०२०  च्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्याचा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचा निर्णय.

१ मे २०२०

  • मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांचा फेसबुक लाईव्हद्वारे जनतेसोबत संवाद – प्रमुख मुद्दे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी, टाळेबंदीसंदर्भात 3 मे नंतर परिस्थिती पाहून सावधतेने, सतर्कता बाळगून निर्णय, रेडझोन मध्ये आता मोकळीक देणे राज्याच्या हिताचे नाही, रेड झोन मधील नियम अधिक कडकपणे पाळावे लागतील, ऑरेंज झोनमध्ये बाधित क्षेत्र सोडून इतर ठिकाणी तसेच ग्रीन झोनमधील निर्बंध टप्प्या टप्प्याने शिथील करण्याचा प्रयत्न, परराज्यातील जे नागरिक महाराष्ट्रात अडकले त्यांना त्यांच्या राज्यात सुखरूपपणे पाठवण्यासाठी शासनामार्फत व्यवस्था, संबंधित राज्यांच्या प्रशासन, मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु, राज्या-राज्यांमधील समन्वयातून त्यांना त्यांच्या राज्यात पाठवणार, त्याचपद्धतीने इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना महाराष्ट्रात परत आणणार, राज्यांतर्गत अडकलेल्या लोकांना जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करणार, शेती आणि शेतीसंबंधीचे व्यवहार, कृषी माल वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक यावर कोणतेही बंधन नाही, बि-बियाणांची कमी पडणार नाही.  लॉकडाऊनमुळे कोराना विषाणुचा गुणाकार रोखण्यात यश, कोरोनाची लक्षणे दिसताच घरच्या घरी उपाय करू नका, तत्काळ फिव्हर रुग्णालयात जाऊन उपचार करा, मुंबईत घरोघरी जाऊन 2 लाखाहून अधिक तपासण्या,कोविड योद्धा होऊन शासनासोबत काम करण्याचे आवाहन केल्यानंतर राज्यातून उत्तम प्रतिसाद, जवळपास 20 हजार लोकांकडून इच्छा व्यक्त, 10 हजार लोकांनी प्रत्यक्षात तयारी, त्यांचे प्रशिक्षण सुरु.
  • राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे, ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 ला

1 कोटींची मदत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धनादेश सुपूर्द.

  • लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत राज्यात ८७,३९१  गुन्हे दाखल, १७,६३२ व्यक्तींना अटक, या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी १० लाख रुपयांचा दंड.
  • कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोना बाधित क्षेत्रातील सात  कारागृहे लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला होता,  त्यात आता आठव्या नागपूर मध्यवर्ती या कारागृहाची   भर. हे कारागृह तातडीने लॉकडाऊन करण्याचा गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निर्णय.
  • ‘कोरोना’च्या संकटकाळात अर्धांगवायू, दमा, हृदयविकार व अन्य दुर्धर व्याधींनी त्रस्त रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयांची व्यवहार्य यंत्रणा तयार करण्याच्या दृष्टीने शासकीय व खासगी रुग्णालयासाठी नवीन शासन आदेश काढण्यात आला असल्याची मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती.
  • महात्मा फुले जनआरोग्य योजनेत राज्यातील 100 टक्के लोकसंख्येचा समावेश, कोरोना रुग्णांकडून अवाजवी दर आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप, या योजनेंतर्गत सहभागी 1000 रुग्णालयांमध्ये जर कोरोना रुग्णालयांचा समावेश असेल तर तेथे कोरोनाच्या रुग्णांवर मोफत उपचार. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये 2000 अतिरिक्त खाटांची उपलब्धता, दाट लोकवस्तीच्या ठिकाणी राहणाऱ्या आणि ज्यांना मधुमेह, रक्तदाब अशा अन्य आजारांची लक्षणे (कोमॉर्बीड) असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे सर्वात आधी सर्वेक्षण, आवश्यकता भासल्यास त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करुन त्यांच्यावर वेळेवर उपचार करण्याची, नवी कार्यपद्धती ठरविण्यात आल्याची आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती.

२ मे २०२०

  • महाराष्ट्र सायबर विभागामार्फत लॉकडाऊनच्या काळात ३४१ गुन्हे दाखल, मुंबई व नवी मुंबई कामोठे नवीन गुन्हे, १७७ लोकांना अटक.
  •  मुंबई आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा या क्षेत्रातील शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी खुलासा- (१)  पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नाशिक, अमरावती, सोलापूर नागपूर आदी)  आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची  परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांना. (२)  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून  या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास  परवानगी नाही. (३) या दोन्ही प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर (विशेषत: कामगार, मजुरांना) जाण्याची परवानगी.(४) अशा परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. सर्व पोलीस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठविली जाईल. अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील कोविड-१९ प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून  पुढील कार्यवाही.
  • दिव्यांगांसाठी ‘दिव्यांगसाथी’ (divyangsathizpbeed.com) संकेतस्थळाचा सामाजिक न्यायमंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या मार्फत बीड येथे शुभारंभ.
  • लॉकडाऊन कालावधीत कोविड संदर्भात आतापर्यंत ८९ हजार गुन्हे दाखल,५१ हजार वाहने जप्त.
  • लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागामार्फत  ३४१  गुन्हे दाखल.
  • लॉकडाऊनचा कालावधी 17 मे 2020 पर्यंत वाढविणे, या काळात करावयाच्या उपायांच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांसंदर्भात शासनआदेश जारी. रेड (हॉटस्पॉट),ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील धोक्यांची तीव्रता लक्षात घेऊन या सूचनांची अंमलबजावणी,  काही भागांमध्ये कामांसाठी परवानगी असली तरी कोविड १९ प्रादुर्भावापासून सुरक्षित राहण्यासाठीच्या नियमांचे काटेकोर पालन आवश्यक.
  • आज १२१ कोरोनाबाधित रुग्ण बरे, आतापर्यंत २००० रुग्ण बरे, कोरोनाबाधीत ७९० नवीन रुग्णांची नोंद, एकूण रुग्णसंख्या १२ हजार २९६ , ९७७५ रुग्णांवर उपचार सुरू. पाठविण्यात आलेल्या १ लाख ६१ हजार ९२ नमुन्यांपैकी १ लाख ४८ हजार २४८ जणांचे प्रयोगशाळा नमुने, करोना निगेटिव्ह तर १२ हजार २९६ पॉझिटिव्ह आले, १ लाख ७४ हजार ९३३ लोक होम क्वारंटाईनमध्ये, १२ हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

इतर

२६ एप्रिल २०२०

  • महात्मा बसवेश्वरांना मुख्यमंत्री ठाकरे यांचे अभिवादन, अक्षय्यतृतीयेनिमित्त जनतेला शुभेच्छा
  • ‘कोरोना’ संकटावर मात करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या क्रांतीकारी संकल्पना प्रेरणादायी  असल्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे प्रतिपादन.
  • महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस परिवहन मंत्री ॲड अनिल परब यांच्या मार्फत पुष्पहार अर्पण करुन मंत्रालय येथे अभिवादन.
  • ज्येष्ठ साहित्यिक झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांच्या निधनाने, माती आणि माणसे यांच्याशी नाळ जुळलेला कसदार साहित्यिक महाराष्ट्राने गमावला  असल्याची शोकभावना , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून व्यक्त.
  • समाजातील उपेक्षित, वंचित वर्गाच्या वेदनांना साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम ‘झुलवाकार’ उत्तम बंडू तुपे यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे केले. त्यांच्या निधनाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा साहित्यिक वारसा पुढे नेणारा महान साहित्यिक हरपला असल्याची शोकभावना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याद्वारे व्यक्त.

२७  एप्रिल २०२०

  • महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर राज्यपाल महोदयांनी तातडीने कार्यवाही करावी या विनंतीचा मंत्रिमंडळामार्फत पुनरुच्चार.

२८ एप्रिल २०२०

  • बुलदंशहर येथील साधूंच्या हत्येप्रकरणी, मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली चिंता.
  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यामार्फत कोलकाता उच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश,न्यायमूर्ती दीपांकर दत्ता  यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ.  यावेळी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, उपस्थित.
  • राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी व त्यासोबत राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने होण्यासाठी २० हजार कोटी रूपयांचा निधी केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गास द्यावा अशी, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांची केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी.

९ एप्रिल २०२०

  • इरफान खान यांच्या निधनाबद्दल राज्यपाल श्री  भगतसिंह कोश्यारी  यांना दुःख.
  • नाविद अंतुले यांच्या आकस्मिक  निधनामुळे  तरुण तडफदार नेतृत्व आपल्यातून गेले, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत शोक व्यक्त.
  • अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्फत अभिनेता इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण.
  • कलाकार म्हणून अभिनयाचा  दर्जा प्रत्येक सिनेमात वाढवणाऱ्या इरफान खान यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीने ‘हरहुन्नरी‘ अभिनेता गमावला असल्याची भावना, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याकडून व्यक्त.
  • अभिनेता इरफान खान यांचे निधन हे भारतीय चित्रपटसृष्टी आणि , कलाजगतासाठी मोठा धक्का, त्यांच्या अकाली निधनाने एक दमदार अभिनेता, संवेदनशील माणूस, लढाऊ व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांची श्रध्दांजली.
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून दाखवलेला ‘ग्रामोन्नती’चा मार्गच राज्य आणि देशाला विकासाकडे घेऊन जाईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याद्वारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा गौरव आणि  जयंतीनिमित्त आदरांजली.

दि ३० एप्रिल २०२०

  • चित्रपट सृष्टीतील दोन पिढ्यांतील मार्गदर्शक दुवा निखळला, कला क्षेत्राची हानी – ऋषी कपूर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली.
  • ऋषी कपूर यांच्या निधनाने निखळ आनंद देणारे हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार व्यक्तीमत्व हरपले – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली.
  • ऋषी कपूर यांच्या निधनाने  चित्रपटसृष्टीतील सदाबहार तारा निखळला : महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांची श्रध्दांजली.
  • ऋषी कपूर यांच्या अचानक जाण्याने गुणी कलावंताला मुकल्याची, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची प्रतिक्रिया.
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमत्त महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मार्फत सह्याद्री अतिथीगृह येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली.
  • महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हिरकमहोत्सवी वर्धापनदिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागरिकांना शुभेच्छा.  संयुक्त महाराष्ट्राचा लढा महाराष्ट्राने ज्या ताकदीने ‘कोरोना’विरुद्ध लढू आणि जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांकडून  व्यक्त.
  • महाराष्ट्राला कोरोनामुक्त करुन राज्य सतत प्रगतीपथावर ठेवू या अशा महाराष्ट्र राज्य स्थापनादिनाच्या हीरक महोत्सवानिमित्त, विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांच्या जनतेला शुभेच्छा

दि. १ मे २०२०

  • संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना राज्याच्या 60 व्या वर्धापन दिन तथा हिरक महोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्फत हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन.
  • राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण– राजभवन- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी / विधानभवन– विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले/ मंत्रालय- मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे / पुणे- उपमुख्यमंत्री  श्री अजित पवार / मुंबई शहर जिल्हा– पालक मंत्री श्री. अस्लम शेख/ मुंबई उपनगर जिल्हा– पालकमंत्री श्री आदित्य ठाकरे
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हडफडे नाईटक्लब आग प्रकरण: अधिकारी निलंबित, चौकशीला गती; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना, सर्व पर्यटन आस्थापनांचे सुरक्षा...

कंत्राटदारांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनानंतर पुण्यात बैठक

शरद पवार यांचे सुनील माने यांना आश्वासननवी दिल्ली :...

पुण्यातील उत्तर प्रदेशीय भामट्या रिक्षाचालकाला दिल्लीत जाऊन पकडला..

बाणेरमध्ये एकाला रिक्षाने उडवलं, उपचाराच्या बहाण्याने नेलं ,पण ...