मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रगती व विकासामध्ये शीख समुदायाचे योगदान महत्त्वाचे- राज्यपाल चे. विद्यासागर राव

Date:

गुरु नानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त

आयोजित कार्यक्रमास राज्यपालांची उपस्थिती 

मुंबई – मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रगती व विकासामध्ये शीख समुदायाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.

गुरू नानक विद्याक सोसायटीच्या वतीने गुरु तेगबहादूर नगर येथील गुरू नानक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात गुरु नानक देव यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन व वारसा या विषयावर आयोजित आंतर-धर्मीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार सरदार तारासिंह, आमदार कॅप्टन आर. तमिल सेल्वन, मौलाना आझाद विद्यापीठाचे कुलगुरू पद्मश्री प्राध्यापक अख्तरुल वासे, मोझांबिक आणि स्वित्झर्लंडचे माजी भारतीय उच्चायुक्त डॉ. जसपाल सिंह, गुरु नानक विद्याक सोसायटीचे अध्यक्ष सरदार मनजीत सिंह भट्टी, व्यवस्थापन समितीचे सदस्य सरदार बचन सिंह धाम, सरदार सर्दुल सिंह, गुरू नानक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पुष्पिंदर भाटिया आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. विद्यासागर राव म्हणाले की, 1947 मध्ये फाळणीनंतरच्या स्थलांतरित कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या गुरु नानक विद्याक सोसायटीचे आज वटवृक्षामध्ये रुपांतर झाले आहे.  या संस्थेच्या 38 शैक्षणिक संस्थांमध्ये 25 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

गुरुनानक विद्याक सोसायटीने आपल्या कार्यातून समता, सेवा आणि मानवता ही शीख धर्मतत्त्वे प्रत्यक्ष कृतीत उतरविली आहेत. मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये शीख समुदायाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

पंजाब आणि महाराष्ट्रातील भौगोलिक अंतर मोठे असले तरी अध्यात्म, मानवता आणि सामाईक मूल्यांद्वारे ही दोन राज्य एकमेकांशी जोडली गेली आहेत. तेराव्या शतकात संत नामदेव यांनी भागवत धर्माची पताका पंजाबमध्ये नेली आणि आपले उर्वरित आयुष्य तेथेच व्यतीत केले. त्याचप्रमाणे नंतर दहावे शीख गुरु गोविंद सिंह राज्यात नांदेड येथे आले आणि सत्य धर्माच्या रक्षणासाठी त्यांच्या शिकवण दिली.

शीख धर्म गुरूनानक देव यांनी जगाला दिलेली सर्वोत्तम देणगी-राज्यपाल

गुरु नानकजी भारतातील महान संतांपैकी एक होते. शीख धर्म गुरू नानक देव यांनी जगाला दिलेली सर्वोत्तम देणगी आहे. तर गुरुग्रंथसाहिब ही मानवतेला दिलेली सर्वोत्कृष्ट देणगी आहे. त्यांनी जनतेला अज्ञानाच्या अंध:कारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे काम केले. ते एक अग्रगण्य समाजसुधारक होते. अनिष्ट चालीरिती, अंधश्रद्धेच्या बंधनातून समाजाच्या मुक्ततेसाठी त्यांनी काम केले.

 

गुरु ग्रंथ साहिब हा एकमेव पवित्र ग्रंथ असावा की ज्यामध्ये बाबा फरीद, कबीर, जयदेव, संत नामदेव, रवीदास आणि इतर अनेक संतांच्या वचनांचा समावेश आहे. विविध धर्मतत्त्वांवरील विश्वासाचे हे एक आदर्श उदाहरण समजता येईल.

विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना राज्यपाल म्हणाले की, शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी किंवा चांगली नोकरी मिळवण्यापुरता मर्यादित नसावा. नोकरी मिळवणाऱ्याऐवजी नोकरी देणारे बना, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते राज्याचे माजी पोलीस महासंचालक डॉ. पी. एस. पसरिचा यांना पहिले राय बुलर भट्टी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आयटीतील मतदारांवर नजर; आय टी उमेदवार ऐश्वर्या पठारे निवडणुकीच्या रिंगणात,भाजपचा मास्टर स्ट्रोक

पुणे - उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी पुण्यात भारतीय...

भाजपचे 158 उमेदवार मैदानात

पुणे - भारतीय जनता पार्टीने आपले 158 उमेदवार पुणे...

आपचे 96 उमेदवार पुण्याच्या मैदानात…

पुणे- सगळे पक्ष नेते सारखेच , कोण कोणत्या पक्षात...

पालकमंत्री कुणाचे जनतेचे की गुन्हेगारांचे ? गुन्हेगारी मुक्तीचा वादा, कया हुवा दादा ?

मारटकर हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या कुख्यात गुंड...