पुणे.- रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीचे अध्यक्षपद देवव्रत शहाणे यांनी माजी अध्यक्षा दीपा गाडगीळ यांच्याकडून स्विकारले. पी.वाय.सी हिंदू जिमखानाच्या सभागृहात हा समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमास सन्माननीय अतिथी म्हणून मराठी कलाकार सुनील बर्वे, तर रोटरी जिल्हा ३१३१ चे २०१६-१७ चे प्रांतपाल प्रशांत देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच माजी प्रांतपाल विनय कुलकर्णी, दिपक शिकारपूर, कल्याण वर्दे, सुधीर राशींगकर, सुभाष सराफ आणि १७-१८ चे प्रांतपाल अभय गाडगीळ, १८-१९ चे प्रांतपाल डॉ.शैलेश पालेकरांसह अनेक जिल्ह्यातील अधिकारी वर्ग उपस्थित होता
वर्षभरात राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पांविषयी माहिती देताना नव अध्यक्ष देवव्रत शहाणे म्हणाले की, शाळांसाठी मोबाईल व्हँन लायब्ररी, खेड्यांमध्ये पाण्यासाठी बंधारे बांधणे, अंधमुलींसाठी व्यावसायिक व वैद्यकीय सहाय्य अशा प्रकारचे अनेक सामाजिक उपक्रम आम्ही वर्षभर राबवणार आहोत. समाजामधील सर्व स्तरातील लोकांना या उपक्रमाचा फायदा होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रकल्प आणि कार्यक्रमाविषयी माहिती घेत असताना सुनील बर्वे यांनी रोटरी विषयी आस्थेने विचार मांडले आणि त्यांना युनीव्हर्सिटी क्लबचे सन्माननीय सदस्यत्व बहाल करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रांतपाल प्रशांत यांनी देवव्रत शहाणे यांच्या कामाचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी दीपा गाडगीळ यांनी मागील काही वर्षांच्या कामाचा आढावा घेतला.
कार्यक्रमाच्या सुरवातीस सरस्वतीचे स्तवन मंजिरी शहाणे यांनी म्हटले तर सुत्र संचालन डॉ. सुप्रिया खेपुर यांनी केले. २०१७-१८ वर्षातील अध्यक्ष पल्लवी देशपांडे यांनी आभार मानले.


