मुंबई-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी बदली घोटाळा, फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. आणि त्यांना बीकेसीमधील सायबर पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं होतं. मात्र, गुन्हे शाखेच्या सहपोलीस आयुक्तांनी आपल्याला फोन करून स्वत: घरी येऊन जबाब नोंदवणार असल्याचं म्हटलंय, अशी माहिती फडणवीसांनी दिली होती. त्यानुसार, आज पोलिसांचं एक पथक देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी पोहोचलंय.
सागर बंगल्यावर भाजप नेते जमा झाले असून त्यांच्यात चौकशीआधी बैठक झाली. बैठकीत महाविकास आघाडीविरोधात आगामी काळातील डावपेच आखले गेले. फडणवीस यांचा जबाब नोंदविण्यासाठी सागर बंगल्यावर पोहचले आहेत.सुमारे २ तास पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी या बंगल्यात काढले.
बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असून त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप एक पत्रकार परिषदे घेत केला होता. पैसे घेऊन पोलिसांच्या त्यांच्या मर्जीप्रमाणे बदल्या केल्या गेल्या, असा आरोप फडणवीसांनी केला होता. यानंतर फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीसांविरुद्ध मुंबईतील सायबर पोलिसांत गु्न्हा दाखल झालेला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी आज बीकेसी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात फडणवीसांना नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतर पोलिस फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यातच चौकशी करत आहेत. पोलिसांनी एक प्रश्नावलीच फडणवीस यांच्यासाठी तयार केली आहे.
फडणवीसांना विचारले हे प्रश्न
- रश्मी शुक्लांनी केलेल्या फोन टॅपिंगची तुम्हाला माहिती होती का?
- सभागृहात मांडलेला गोपनिय अहवालातील माहिती आपल्याकडे कुठुन आले?
- केंद्रीय गृहमंत्रालयाला आपण डाटा दिला त्यात नेमके काय आहे?
- रश्मी शुक्ला एसआयटी प्रमुख होत्या, तेव्हा गोपनिय माहितीत ज्या पुराव्यांचा उल्लेख केला ते आपल्याकडे कुठुन आले?

