मुंबई -माझे उत्तर तयार आहे. पण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्या उत्तर द्या, अशी विनंती मला केली आहे. त्यामुळे मी उद्या सभागृहात उत्तर देईन. असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर वेगवेगेळे आरोप केले होते. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील नेते फडणवीस यांनी प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
महाविकास आघाडी सरकारकडून गिरीष महाजन यांनी फसवण्याचा कट सुरू असल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. त्यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. वळसे पाटील म्हणाले की, “माझे उत्तर तयार आहे. पण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्या उत्तर द्या, अशी विनंती मला केली आहे. त्यामुळे मी उद्या सभागृहात उत्तर देईन. “दूध का दूध, पानी का पानी होईल. करारा जवाब मिलेगा.” असे पाटील यांनी ठणकावून सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर आज विधानसभेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उत्तर देणार होते. मंगळवारी सभागृहात फडणवीसांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी तयार होतो. मात्र फडणवीस यांनी यावर उद्या (गुरुवारी) बोला अशी मागणी केली. त्यामुळे मी उद्या उत्तर देऊन दूध का दूध अन् पानी का पानी करणार असल्याचे म्हटले आहे. पुढे पाटील म्हणाले की, फडणवीसांनी खरेतर कायदा सुवस्था यावर बोलायचे होते. पण ते त्यांच्या कर्तव्यापासून दूर गेले आहेत. अशी टीका देखील यावेळी वळसे पाटील यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह एसीपी सुष्मा चव्हाण आणि मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे उपस्थित होते. सुष्मा चव्हाण यांनी सर्व कागदपत्रे गृहमंत्र्यांकडे दिल्याची माहिती आहे.
विधानसभेत काय म्हणाले होते फडणवीस
माझ्यासह गिरिश महाजन यांना संपवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. आमच्याविरुद्ध खोटे पुरावे तयार करीत असेल तर लोकशाही आहे का? आम्हाला संपविण्याच्या कारस्थानाचे पुरावे माझ्याकडे आहेत. माझ्यासह गिरीश महाजनांविरोधात कसा कट शिजला याचे कारागृहात व बाहेर असलेल्या लोकांचे सव्वाशे तासांचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. एवढे पुरावे आहेत की त्यातून 25 वेबसिरीज तयार होतील असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
आमदार गिरीष महाजनांवर मोक्का लावण्यासाठी सरकारने कट रचला. त्यात शरद पवारसह अनेक मंत्री सहभागी असल्याचा आरोप देखील त्यांनी सभागृहात केला. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप देखील फडणवीसांनी सभागृहात सादर केली. विधीमंडळाच्या सायंकालीन सत्रात त्यांनी सडेतोड, तडाखेबंद भाषण त्यांनी केले. फडणवीस गौप्यस्फोट करत असताना सभागृहात मोठी शांतता पसरली होती. फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांना पुराव्यांचा पेनड्राईव्हच दिला. त्यानंतर सभागृहात निवेदन करताना त्यांनी पोलखोल केली.
ते म्हणाले, गिरीश महाजनांवर मोक्का लागावा यासाठी राज्य सरकारने सरकारी वकिलांना हाताशी धरुन खटाटोप केला. त्यात पोलिसांचाही सहभाग आहे. हे सर्व कुंभांड रचण्यात आले. एफआयआर सरकारी वकिलाने लिहिला. जबान्या त्यांनी पाठ केल्या. हे सर्व सरकारी वकील स्वःत तोंडाने सांगतात.
महाविकास आघाडीच्या सुनिल गायकवाड, रविंद्र शिंदेने नाथाभाऊंशी बोलणे झाले की, गिरीश महाजनांना फसवायचे. अजित पवार सहकार्य करीत नाही. पण मोठे साहेब सर्व पाहताहेत अशा संवादाचे व्हिडीओतील कागदावर लिहिलेले संवाद फडणवीसांनी सभागृहात वाचून दाखविले. अॅड. प्रवीण चव्हाण कट कसा रचत आहेत याचा पाढाच त्यांनी वाचला. सुट बुक केला. व्हेज – नाँन व्हेज जेवण करायचे का, मदत लागली तर खडसे साहेबांची घ्या असे काही संवादही त्यांनी वाचून दाखविले. हे षंडयंत्र सरकारातील काही व्यक्तींनी आमच्या विरोधात रचले असा आरोपही त्यांनी केला. सरकारी वकिल अॅड. प्रवीण चव्हाण विरोधात पुरावे आहेत. गिरिश महाजनांनरील बोगस केसचे पुरावे माझ्याकडे आहेत असेही ते म्हणाले.

