देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ,अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Date:

मुंबईच्या राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवार एकटेच याठिकाणी दिसले. तर भाजपचे अनेक नेते येथे उपस्थित होते. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राला एक स्थिर सरकार देण्याची गरज होती, यासाठी मी अजित पवारांचे अभिनंदन करतो आणि त्याबीचे आभार मानतो की, त्यांनी हा निर्णय घेतला. राज्यपालांकडे आम्ही सरकारच निर्मितीचा दावा केला आणि त्यानंतर राज्यपालांनी नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून आम्हाला शपथ घेण्यासाठी आमंत्रण दिले. आमच्या मित्रपक्षाने मी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा आभारी आहे कि, त्यांनी आम्हाला पुन्हा जनतेची सेवा करण्याची संधी दिली. सध्या शेतकऱ्यांची समस्या सर्वात मोठी आहे. महाराष्ट्राच्या हिताकरिता हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. राज्यपाल आम्हाला वेळ देतील त्यावेळेत आम्ही आमचे बहुमत सिद्ध करू. त्यानंतर योग्यवेळी मंत्रिमंडळाची स्थापनाही होईल.”

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार म्हणाले, “आजपर्यंत कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकला नाही, महाराष्ट्राला शेतकरी प्रश्नांसह अनेक अडचणींचा सामना करावा लागला, म्हणून आम्ही एक स्थिर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...