Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पेट्रोल-डीझेलच्या किमतींवर देवेंद्र फडणवीस राज्याच्या जनतेशी खोटे बोलत आहेत-रोहित पवार

Date:

पेट्रोल आणि डीझेलचे दिवसेंदिवस वाढते दर राज्य आणि देशभरात संतापाचा विषय बनला आहे. यावरूनच आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये जुंपली आहे. इंधनाच्या वाढत्या दरांच्या विरोधात महाविकास आघाडीचे ठिक-ठिकाणी आंदोलन झाले. पण, यासाठी राज्य सरकार आणि राज्य सरकारची कर पद्धत जबाबदार असल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. तोच दावा आता एक व्हिडिओ जारी करून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खोडून काढला आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/1413716974329233411

फडणवीस खोटे बोलतात -रोहित पवार
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला. या व्हिडिमध्ये फडणवीसांनी काय म्हटले आणि राज्य सरकारला कसे जबाबदार धरले हे दाखवण्यात आले. तर पुढे याच व्हिडिओमध्ये फडणवीस कसे खोटे बोलत आहेत त्याची पोलखोल रोहित पवारांनी केली. व्हिडिओ ट्विट करून रोहित पवारांनी लिहिले, “खोटे बोलायचे आणि रेटून बोलायचे ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले 12 रुपये राज्यांना मिळतात असे हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आले. देशात इतर कुठेही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही.”

रोहित पवार पुढे म्हणाले, “केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या 32.90 रु पैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण मात्र राज्याला 12 रु मिळत असल्याचे सांगतात.”

“विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी 12 रु दिसत असतील तर याला काय म्हणावे? सगळीकडे अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असे धडधडीत खोटे बोलणे कुठल्याही नेतृत्वाला शोभणारे नाही.”

काय म्हणाले होते फडणवीस?
पेट्रोल-डिझेल आपल्याकडे 30 रुपयांमध्ये (प्रति लिटर) मिळते. त्यावर काही कर आणि वाहतूक खर्च मिळून त्यावर केंद्र सरकार 32 रुपये कर लादते आणि त्यातून राज्य सरकारला 12 रुपये मिळतात. त्यातही राज्य सरकारकडून अतिरिक्त 30 रुपये कर आकारला जातो. एकूण 100 रुपये पेट्रोलचे दर असेल तर 42 रुपये हे एकट्या राज्य सरकारच्या खिशात जातात असा दावा फडणवीसांनी पुण्यात बोलताना केला होता.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हडफडे नाईटक्लब आग प्रकरण: अधिकारी निलंबित, चौकशीला गती; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना, सर्व पर्यटन आस्थापनांचे सुरक्षा...

कंत्राटदारांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनानंतर पुण्यात बैठक

शरद पवार यांचे सुनील माने यांना आश्वासननवी दिल्ली :...

पुण्यातील उत्तर प्रदेशीय भामट्या रिक्षाचालकाला दिल्लीत जाऊन पकडला..

बाणेरमध्ये एकाला रिक्षाने उडवलं, उपचाराच्या बहाण्याने नेलं ,पण ...