२३ गावांचा विकास आराखडा: महापालिकेची १५ जुलैला ऑनलाइन खास सभा

Date:

पुणे (१२)-महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांचा विकास आराखडा (डीपी) तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी खास सर्वसाधारण सभा घेण्यात येणार असून येत्या गुरुवारी १५ जुलैला ही खास सभा होणार आहे, अशी माहिती पालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली.
पुणे महानगपालिकेच्या हद्दीत नव्याने २३ गावांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पालिकेच्या हद्दीत २३ गावांचा समावेश करण्यात आल्याने शहराची हद्द मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना (एमआरटीपी) अधिनियम १९६६ च्या कलम २१ नुसार नियोजन प्राधिकरण म्हणून पुणे महानगरपालिकेने नव्याने समाविष्ट झालेल्या या २३ गावांचा प्रारूप विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे.
पालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या या गावांचा विकास आराखडा पालिकेने तयार करावा, असा ठराव गेल्या आठवड्यात झालेल्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मांडून त्याला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे.
या गावांचा विकास आराखडा तयार करण्याची मंजुरी देण्यासाठी पालिकेच्या मुख्य सभेची मान्यता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे या विषयावर खास सभा बोलविण्यात यावी, अशी लेखी मागणी स्थायी समितीच्या आठ सभासदांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली होती. त्यानुसार १५ जुलैला सकाळी साडेअकरा वाजता ही खास सभा आयोजित करण्यात आली आहे. दृकश्राव्य (ऑनलाईन) माध्यमातून ही सभा होणार आहे.

मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे महानगरपालिका

महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने आलेल्या या २३ गावांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. यासाठी या गावांचा विकास आराखडा तयार होणे महत्वाचे आहे. त्यामुळे ही खास सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे.

समाविष्ट गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी घेण्यात आलेल्या खास सभेसाठी उपस्थित राहावे, असा ‘व्हीप’ भारतीय जनता पक्षाच्या सर्व सभासदांना बजाविण्यात आला आहे. या गावांचा विकास जलद गतीने व्हावा, हा भाजपचा प्रयत्न आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...