राजकारणामुळे २३ गावांच्या विकासाला खीळ बसू नये – आबा बागूल

Date:

पुणे- महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकास आराखडा करण्यासंदर्भात महापालिकेची खास सभा गुरुवारी महापौर आणि सभागृहनेते यांनी बोलविली या पार्श्वभूमीवर राजकारणामुळे २३ गावांच्या विकासाला खीळ बसू नये असे आवाहन महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला कॉंग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी केले आहे.

या संदर्भात त्यांनी म्हटले आहे कि ,’ महानगरपालिकेच्या हददीत नुकताच २३ गावांचा समावेश झालेला आहे. यामुळे पुणे शहर हे भौगोलिकदृष्टया राज्यातील सर्वात मोठे शहर बनलेले आहे. २३ गावांचा महानगरपालिका हददीत समावेश होणेपूर्वी पीएमआरडीए कडून प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. हा जवळपास अंतिम टप्प्यात असताना सदर २३ गावे महानगरपालिका हददीत समाविष्ट झाली. त्यामुळे सदर २३ गावांचा विकास आराखडा पीएमआरडीएला प्रसिध्द करता येणार नाही. पीएमआरडीए अधिकारी व त्यांचे (शासकीय अधिकारी) तज्ञ टाऊन प्लॅनर यांनी प्रारूप विकास आराखडा तयार केला असून यासाठी मोठा अवधी व मोठया प्रमाणात खर्च देखील झालेला आहे.
यापूर्वी ११ गावांचा समावेश महानगरपालिकेच्या हददीत झाला असून या गावांचा विकास आराखडा आजही प्रलंबित असून भाजप हा विकास आराखडा करू शकली नाही. ११ गावांतील नागरिक यामुळे खंत व्यक्त करीत आहेत.
आता नव्याने सदर 23 गावांचा विकास आराखडयाबाबत कार्यवाही करताना 23 गावाच्या विकासावर विपरित परिणाम हाेणार नाही याची दक्षता घ्यावी. पूर्वी पीएमआरडीए ने केलेला प्रारूप विकास आराखडा घेवून त्यामध्ये पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या मार्फत शहराच्या विकासाच्या दृष्टीने योग्य  ते बदल करून नागरिकांच्या हरकती व सूचनांकरिता प्रसिध्द करण्यात यावा. तदनंतर हा मुख्य सभेच्या मंजूरीने राज्य शासनास पाठविण्यात यावा. 23 गावांचा विकास आराखडा अंतिम झाल्यावरच 23 गावांच्या विकासाला ख-या अर्थाने न्याय मिळेल. 23 गावांच्या विकासाच्या बाबतीत उचित कार्यवाही न झाल्यास 23 गावे बकाल झाल्याशिवाय राहणार नाहीत.
भाजप सत्ताधारी पक्षाकडून 23 गावांचा विकास आराखडा तयार करणेसाठी इरादा जाहिर करणेबाबत मुख्य सभा बोलाविली आहे. ऑनलाईन मतदान घेता येणार नाही असे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले असताना बहुमताच्या जोरावर निर्णय घेता येणार नाही, याचे भान ठेवून 23 गावांच्या हिताच्या दृष्टीकोनातून निर्णय होणेसाठी सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षांना विश्वासात घेवून काम करणे आवश्यक आहे. असेही आबा बागुल यांनी म्हटले आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...