Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

बेकायदेशीर दुचाकी व्यवसायाला परवानगी देणार नाही; सरकार रिक्षा चालकांच्या बाजूने

Date:

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या शिष्टमंडळाला आश्वासन

बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक

पिंपरी / प्रतिनिधी-बेकायदेशीर दुचाकी व्यवसायाला कायदेशीर परवानगी नाही. याबद्दल मी परिवहन आयुक्त आणि व पोलिसांना योग्य ते आदेश दिले आहेत. बेकायदेशीर गोष्टींना आमचे समर्थन नाही. सरकार रिक्षाचालकांच्या बाजूने असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच महाराष्ट्र मध्ये २० लाख रिक्षा चालक – मालक असून रिक्षा चालकांचे प्रश्न अत्यंत बिकट झाले आहेत. त्याबद्दल मला जाणीव असून रिक्षा चालक मालकांच्या प्रश्नाबद्दल लवकरच व्यापक बैठक लावणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत रिक्षा चालक मालकांच्या प्रश्नावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई मंत्रालय येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले असल्याची माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांच्या नेते अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या वेळी कृष्णा कराड रिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गफारभाई नदाफ कार्याध्यक्ष रहीमभाई पटेल, सदाशिव तळेकर आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले की, रिक्षा चालक मालकांसाठी परिवहन विभागांतर्गत स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे. लॉकडाऊनमुळे रिक्षा चालक – मालक यांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामध्येच ओला उबेरची बेकायदेशीर दुचाकी सुरु झाल्याने रिक्षा व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. हे दुचाकीचे ऍप बंद करण्यात यावे. कोविडनंतर रिक्षावाल्यांचे प्रश्न आणि समस्या या बाबत व ईतर विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड, पुणे शहरामध्ये बेकायदेशीरपणे दुचाकी सुरु असून ओला उबेरच्या या बेकायदेशीर ॲप मुळे रिक्षा व्यवसायावर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाला आहे. रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधामध्ये रिक्षा चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्याच्याच निषेधार्था व विरोधात मोर्चा देखील काढला. कोविडमुळे अगोदरच मेटाकुटीला आलेल्या रिक्षाचालकांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. रिक्षा चालकांचे हप्ते थकले असून त्यांना हप्ते भरणे ही अवघड झाले आहे. या परिस्थितीत आलेल्या बेकायदेशीर दुचाकीमुळे आणखीन त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे हे ऍप बंद झाले पाहिजे असे बाबा कांबळे या वेळी म्हणाले.

या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र मोठ्यात संख्येने रिक्षा चालक मालक असून रिक्षाचालकांचे प्रश्न अत्यंत बिकट झाली आहे त्याबद्दल मला जाणीव असून मी रिक्षा चालक मालकांच्या प्रश्नाबद्दल लवकरच परिवहमंत्री, कामगार मंत्रित व संबंधित अधिकारी यांची बैठक लावणार आहे. कोरोड नंतर रिक्षाचालकांचे कर्जाचे हफ्ते थकले असून फायनान्स कंपनीकडून त्यांना त्रास दिला जात आहे. त्यांच्या प्रश्नाबद्दल देखील सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीएमआरडीए प्रकल्पातून २७ गावांना मिळणार प्रगत सांडपाणी व्यवस्थापन!

१६ क्लस्टर्समध्ये ₹१,२०९ कोटींचा खर्च; पर्यावरण रक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान...

संस्कृती, परंपरा जपत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न : श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ सातारा :...

‘नवा भारत समजून घ्यायला हवा’

पुणे, १६ डिसेंबरभारत महाशक्ती म्हणून पहिल्यांदाच सिद्ध होत असल्यामुळे...