बारामतीच्या कामांना दिलेली स्थगिती उठवण्याची मागणी, सूडबुद्धीने निर्णय न घेण्याचे आवाहन-अजित पवारांसह राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Date:

मुंबई-

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी बारामतीमधील कामांना दिलेली स्थगिती उठवावी. तसेच, सूडबुद्धीने कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी यावेळी अजित पवारांनी केली.

941 कोटींच्या कामांना स्थगिती

मविआने मंजूर केलेल्या 941 कोटींच्या नगर विकास विभागांच्या कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच स्थगिती दिली. विशेष म्हणजे यापैकी तब्बल 245 कोटींची कामे ही बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून होणार होती. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे व हसन मुश्रीफ यांनी मुख्यंमत्री दालनात एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

2021च्या बजेटमधील कामे

मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतीच स्थगित केलेली 941 कोटींची कामे ही 2021च्या अर्थसंकल्पातील होती. त्यामुळे त्यांचा निधी आता रोखू नये, अशी मागणी अजित पवार यांनी केली. यावेळी धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांनीही आपल्या मतदारसंघातील कामांबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली हे समजू शकलेले नाही. अजित पवारांनी आपल्या मागण्यांबाबतचे निवेदनही मुख्यमंत्री शिंदे यांना दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसला झटका

शिवसेनेच्या आमदारांना राष्ट्रवादीकडून निधी दिला जात नव्हता, असा आरोप करत शिवसेना आमदारांसह एकनाथ शिंदेंनी बंड केले होते. त्यानंतर सत्तेत येताच मविआ सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्याचा धडाका मुख्यमंत्री शिंदे यांनी लावला आहे. विशेषत: काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांना मंजूर झालेला निधीला स्थगिती दिली जात आहे. अद्याप शिवसेना आमदारांच्या कोणत्याही कामांना स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघातील कामांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतल्या प्राचार्याला पोक्सोची धमकी देऊन पोलिसांनीच ७ लाख लुटले-फौजदार आणि महिला मार्शलसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : महाविद्यालयातील विद्यार्थीनीला धाक दाखवून अपहरण केल्याची तक्रार...

महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुडघेदुखीवर शस्त्रक्रियामुक्त उपचारपद्धतीचा प्रारंभ

लो-डोस रेडिओथेरपीमुळे सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळणार. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर...

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकरणीची यादी जाहीर

मुंबई, दिनांक ०९ एप्रिल २०२६ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा,...

निवडणुकीतील ईव्हीएमची VVPAT ची तपासणी करा: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६...