पुणे- दिल्लीत होणाऱ्या घडामोडींबाबत च्या येणाऱ्या बातम्या पहाता आणि ऐकता, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची दिल्ली पोलीसांकरवी मोदी सरकारने छळवणूक सुरु केल्याची भावना येथे जनतेत पसरते आहे . निवृत्त जवानाच्या आत्महत्येच्या घटनेमुळे orop म्हणजे वन रँक वन पेन्शन बाबत सरकार सैनिकांबाबत देखील निर्णय लवकर घेत नसल्याची भावना पसरली आहे . एक तर या पूर्वी सैनीकांची वेतन पद्धती यावर देखील यापूर्वी हलकीशी झलक लोकांच्या कानावर गेलेली असताना याबाबत सरकार केवळ सैनिकांच्या ‘ मृत्यू चे किंवा शहीद होण्याचे किंवा शौर्याचे राजकीय भांडवल करीत आहे अशी काँग्रेस जणांची भावना आता जनतेत देखील पसरत आहे काय? असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे .या पार्श्वभूमीवर दिल्लीत दस्तुरखुद्द इंदिरा गांधींचा नातू , राजीव गांधींचा पुत्र आणि गांधी घराण्याचा राजकुमार अशी प्रतिमा असलेल्या राहुल गांधींना प्रत्यक्षात पोलिसांनी अडविणे , त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवणे , किंवा वारंवार ताब्यात घेतल्याच्या बातम्या येणे,म्हणजे मोदी सरकार ची दमदाटी अत्युच्च पातळीवर पोहोचत आहे काय? असा देखील प्रश्न सामान्य माणसाला भेडसावीत आहे . आम आदमी चे केजरीवाल अगोदरच मोदींच्या वावटळात आपली नौका हाकीत आहेत, असे देखील मत आहे . त्यात आता ही भर पडल्याने मोदी यांच्या एकूण राजकीय भूमिकेबाबत संशयाचे वलय जनतेत निर्माण होऊ पाहत आहे . काँग्रेस ला लोकसभा आणि अन्य निवडणुकीत जनतेने नाकारले असले, तरीही गांधी घराण्याबद्दल भारतवासीयांच्या मनात आपुलकीचे आणि आदराचे स्थान आहे , जे अद्याप कोणीही मिळवू शकलेले नाहीत कदाचित भाजप देखील मिळवू शकणार नाही, अशी भावना आहे . पण थेट दिल्ली पोलीस आणि राहुल गांधी अशी चकमक आता भासू लागल्याने जनतेत याबाबत प्रक्षोभ उसळू शकतो असे मत बनू पहात आहे .
दरम्यान -ज्या अहंकाराने काँग्रेसला बुडवले तोच अहंकार भाजपलाही बुडवेल अशी घणाघाती टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर केली आहे. मी पोलिसांच्या अटकेला घाबरत नाही, पण पोलिसांनी रामकिशन ग्रेवाल यांच्या कुटुंबीयांना का अटक केली होती? हे स्पष्ट करावे असेही ते म्हणाले आहेत.
तर राहुल गांधी यांना संध्याकाळी दिल्ली पोलिसांनी अडवून ठेवले त्याबाबत राहुल गांधी काय म्हणतात हे दाखविणारी आणि ऐकवणारी व्हिडीओ क्लीप देखील लोकांच्या मनात घरघर करू शकणार आहे .. पहा ही व्हिडीओ क्लीप….