Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

तळजाईच्या जंगलात वनखात्याकडून वृक्षतोड -मंत्री भरणेसाहेब काही बोलाल काय ?

Date:

पुणे- तळजाई च्या वृक्षांसाठी आंदोलने करत महापालिकेच्या वसुंधरा प्रकल्पांना सुरु केलेला विरोध हा पूर्णपणे दिशाभूल करणारा आणि राजकीय पोळी भाजून घेणारा असल्याचे निष्पन्न होत आहे .तळजाई मध्ये वृक्ष तोड होत आहे हे खरेच आहे . पण ती वृक्ष तोड महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या तळजाईत होत नसून ती राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या तळजाई च्या जंगलात होत आहे , आणि हे जाणूनही तळजाई बाबत होणारी दिशाभूल आणि त्यास साथ देणाऱ्या मोहिमा या येथे चिंताजनक वातावरण निर्माण करून तळजाई चे संरक्षण करू पाहतात कि तळजाई च्या हरितीकरणाचा ऱ्हास करू पाहतात असा प्रश्न उपस्थित होतो आहे .त्यामुळे तळजाई च्या जंगलात वनखाते का वृक्ष तोड करत आहेत . या जंगलात कित्येक जेसीबी का घुसविले जात आहेत याचे उत्तर महापालिकेने नव्हे तर राज्याच्या वनखात्याने अगर या खात्याचे मंत्र्यांनी देणे गरजेचे असताना नागरिकांना आणि माध्यमांना मात्र येथे होणाऱ्या आंदोलनांनी वेगळ्याच दिशेला नेण्याचे काम सुरु तर केले नाही ना ? असा प्रश्न निर्माण होतो आहे . या सर्व पार्श्वभूमीवर येथे तळजाई शी कायमचा संपर्क असलेले सध्याचे मंत्री दत्ता भरणे का बोलत नाहीत ? त्यांनी यावर स्पष्टीकरण देणे गरजेचे नाही काय ? असा प्रश्नही उपस्थित होतो आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते महापालिकेच्या सदू शिंदे मैदानाचे हरीतकरण झाल्यानंतर त्याचे कौतुक इथल्या सर्व नागरिकांनी केले एवढेच नव्हे तर याबाबतच्या श्रेयवादाची लढाई येथे फलक-फलक झळकावून सर्वांच्याच नजरेत स्पष्ट झाली . तळजाई चे दोन भाग आहेत एक महापालिकेच्या हद्दीतील आणि पलिकडचे राज्य शासनाच्या वनखात्याच्या अखत्यारीत असलेले तळजाई चे जंगल . महापालिकेचा वसुंधरा प्रकल्प आणला आबा बागुलांनी, ज्यास प्रचंड विरोध असल्याचे चित्र आता पुन्हा पुन्हा पुढे येते आहे . तळजाई चे रक्षण करण्यात राष्ट्रवादीच्या सुभाष जगतापांचे निश्चित योगदान आहे . त्यासाठी ते संपूर्ण राजकीय कारकिर्दीत झटलेही .त्यातूनच त्यांनाही तळजाई चे महाबळेश्वर कसे करता येईल यासाठी प्रकल्प राबविण्याची इछ्या आणि प्रयत्नही होते त्याच अनुषंगाने असंख्य झाडी लावण्याचे आणि जागविण्याचे विविध कार्यक्रमही त्यांनी सातत्याने राबविले त्यानंतर त्यांनी आबा बागुलांनी आणलेल्या वसुंधरा प्रकल्पाचाही अभ्यास केला . या प्रकल्पातील वर सोलर पार्क -खाली वाहनतळ असलेल्या बांधकामास त्यांचा प्रखर विरोध होता आणि आहे .तळजाई च्या वृक्षांचे हरितीकरण प्रकल्पांचे सर्वच स्वागत करतात त्यासाठी हे दोघेही ज्येष्ठ नगरसेवक आग्रही आहेतच . पण या दोहोत विस्तव जात नाही अशी स्थिती आहे . त्यामागे श्रेयवाद आहे कि राजकारण ते हे दोघेच जाणोत . पण तळजाईचे भले दोघांनाही हवे आहे ,अश्विनी कदमांचे ,महेश वाबळे यांचेही तळजाईरक्षणा साठी वारंवारचे प्रयत्न आहेत असे असतानाही मग वाद विवाद का घडत आहेत ? नेमके काय कारण या मागे आहे.

सदू शिंदे मैदानाच्या बारमाही हरितीकरण प्रकल्पाला अगोदर ज्यांचा विरोध होता तो विरोध हि हा प्रकल्प पूर्ण होऊन वापरात आल्यावर चुकीचा होता हे स्पष्ट झाले आहे. तळजाई उन्हाळ्यात ओसाड पडलेली असते . आणि पावसाळ्यात, हिवाळ्यात च येथे हिरवाई असते पण तळजाई हि बारा महिने हिरवीगार राहावी खरोखर ती शहराचे वैभव आहे एवढेच नव्हे तर ती शहराची फुफुसे आहेत असे मानले जाते . मग ती उन्हाळ्यातही का हिरवीगार राहू नये . या दृष्टीने महापालिकेच्या हद्दीतील तळजाई त बारमाही हरितीकरण प्रकल्प राबविला जावा हि सर्वांचीच धारणा आहे . मात्र त्या नावाखाली कॉंक्रीटच्या कामाला मात्र तीव्र विरोध येथे आहे आणि राहील हे वास्तव आहे . असे अताना तळजाई चे जंगल जे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे तिथे आणले गेलेले जेसीबी , या जंगलात होणारी वृक्ष तोड यास जागेवर जाऊन विरोध कोणी केलेला नाही , म्हणजेच आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी अशी आंदोलन करणारांना उपमा कोणी दिली तर फारसे नवल वाटणार नाही .ज्या ज्या राजकीय पक्षांनी यावर आंदोलने आणि मोहिमा सुरु केल्या आहेत त्यांनी वस्तू स्थितीवर आणि वास्तवतेवर प्रकाश झोत टाकावा म्हणजे पुढे जाऊन केवळ प्रसिद्धीसाठी ,राजकारणासाठी तुम्ही ही कारस्थाने केलीत असे तुम्हाला नको असलेले बालंट कोणी तुमच्या कपाळावर मारू शकणार नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...