पुणे : तृतीयपंथीयांसाठी आवश्यक योजना महानगरपालिकेच्या वतीने सभागृहात व शासन दरबारी मांडून मान्य करून घेऊ, असे विरोधीपक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी सांगितले. तृतीयपंथी व्यक्तींना समाजात पुढे आणण्यासाठी चांगल्या शासकीय व महापालिका आतापर्यंत त्यांच्यासाठी चांगल्या योजना अमलात आणल्या नाहीत. त्याची खंत वाटते. या कार्यक्रमाचे स्वरूप तृतीयपंथीयांना घर सोडावे लागलेल्या या समाजातील घटकाला कर्वे समाज संस्था व हरबिंजर ग्रुप व समाज विकास विभाग पुणे म.न.पा. यांच्यावतीने आयोजित तृतीयपंथी भगिनी यांच्या समोरील आव्हाने व गरजा या यावर चर्चासत्राचे नियोजन करण्यात आले होते.तृतीयपंथीच्या वतीने त्यांचे गुरू दीपा भोसले यांनी सर्व आपल्या समस्या मोकळ्या मनाने मांडल्या व आम्हाला प्रत्येक भागात दवाखान्यात आमच्यासाठी दोन तरी बेड राखीव असले पाहिजे .
आम्हाला बघण्याचा समाजातील लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो. आम्ही तृतीयपंथी असल्या कारणास्तव दवाखान्यात गेले असता लेडीज वॉर्डात किंवा जेन्ट्स वार्डात ठेवण्याचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. आणि तोपर्यंत खूप वेळ झालेली असते .म्हणून आमच्या साठी राखीव बेड दवाखान्यात असले पाहिजे असं यांनी मत मांडले आहे आम्ही कोणतेही काम करू आम्हाला तुम्ही काम द्या आम्ही काम करायला तयार आहोत आम्हाला समाजातील घटकांकडून चांगली वागणूक मिळत नाही प्रत्येक क्षेत्रात आम्हाला वेगळ्या नजरेने पाहिले जाते आम्हाला स्वतःची घरं नाहीत आम्ही या अवस्थेत रोडवरती मागण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही या प्रसंगी महापालिकेचे समाज विकास विभागाचे अधिकारी खुळे साहेब ,हरबिंजर ग्रुपचे पोस्टवाला, रूबी बक्षी ,कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रभारी संचालक महेश ठाकूर, कार्यक्रमाचे संयोजक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब धुमाळ, यशवंत एज्युकेशन सोशल फाउंडेशनचे संस्थापिका व राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला अध्यक्ष नीलम नारायण डोळसकर उपस्थित होत्या.

