मराठवाडयात ओला दुष्काळ जाहीर करा- विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

Date:


मुंबई, दि. २९ सप्टेंबर- अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामधील आठही जिल्ह्यांत अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्याप्रमाणे प्रचंड नुकसान झाले होते त्याचप्रमाणे लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, हिंगोली या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता राज्य सरकारने अतिवृष्टी झालेल्या मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता शेतकरी व जनतेला तातडीने मदत देण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली. केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, मराठवाडयात झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे ज्या भागांमधील शेतकरी अडचणीत आहे त्या भागात कुठल्याही प्रकारचे पंचनामे न करता त्यांना तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे. या भागात नाले दुथडी भरुन वाहत आहेत, तर शेतीपीक पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत तेथील पंचनामे करण्यासाठी व तेथील परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून किमान आठ दिवसांचा कालावधी लागेल. तोपर्यंत येथील शेतकरी व जनतेचे खूप हाल होतील. त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या या भागात ओला दुष्काळ जाहीर झाला तर या भागातील शेतक-यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळू शकेल असेही दरेकर यांनी सांगितले.
दरेकर यांनी सांगितले की, राज्याचे पुनर्वसनमंत्री, कृषीमंत्री यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांमध्ये तातडीने आढावा घेणे आवश्यक आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात परिस्थितीतचा आढावा घेणे गरजेचे आहे. पण हे मंत्री महोदय सध्या निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचे समजते. कृषीमंत्री दादा भुसे पालघरच्या निवडणुकीत व्यस्त आहेत हे दुर्दैवी आहे. राज्यकर्त्यांनी प्रथम संकटात सापडलेल्या जनतेची काळजी घेतली पाहिजे. जनतेला मायबाप सरकार म्हणतात. जनता आहे म्हणून निवडणुका आहेत आणि म्हणून सरकार आहे,याचे भान सरकारला असले पाहिजे, असा टोलाही दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...