पुणे- महापालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका सौ. मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढाकाराने आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालय समोरील रस्ता व रुग्णालयासमोरील गुळवणी महाराज पथाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक समस्येबाबत उपाययोजना करण्यासाठी पाहणी करण्यात आली . यावेळी नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे,वाहतूक पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे,भाजप चे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर,प्रभाग सरचिटणीस बाळासाहेब धनवे, सुभाष ढावरे, या समस्येबाबत सतत लढणारे रवी आठवले,रफिकभाई शेख, संगीताताई आदवडे व स्थानिक नागरिक उपस्थित होते.दीनानाथ रुग्णालयात येणारे नागरिक आतमध्ये पार्किंग न करता नो पार्किंग चे नियम धुडकावून रस्त्यावर गाड्या लावतात त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होते व येथील रहिवाश्यांना स्वतःच्या घरात जाताना देखील अडचणी येतात , याबाबत सातत्याने कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक पायगुडे यांनी स्पष्ट केले, मात्र 24 तास कारवाई करणे शक्य नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.तसेच समोरील गल्लीत 100 मीटर नो पार्किंग चे फलक लावणे व सदर गल्लीत एकेरी वाहतूक प्रस्तावित करण्याबाबत कार्यवाही सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच याबाबत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाशी चर्चा करून त्यांनी एक ट्रॅफिक वार्डन नेमावा व त्यांच्या कडे येणाऱ्या नागरिकांना गाड्या आतमधे लावण्याबाबत लोकशिक्षण द्यावे व तसे आवाहन करणारे फलक लावावेत अशी मागणी आग्रहाने मांडणार असल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
मंगेशकर रुग्णालयासमोर वाहतूक समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय.
Date:

