पुणे, दि. 11 जानेवारी 2022: मुकुंद जोशी आणि डॉ.अमित पाटणकर यांच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत साखळी फेरीत डेक्कन ऍव्हेंजर्स संघाने टेनिस द मिनास संघावर 18-17 असा संघर्षपूर्ण विजय मिळवत विजयी सलामी दिली.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात केतन जाधव, अभिजीत मराठे, मंगेश प्रभुदेसाई, शंतनू शौरी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर डेक्कन ऍव्हेंजर्स संघाने टेनिस द मिनास संघावर 18-17 असा सनसनाटी विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात लायन्स संघाने मॉँट व्हर्ट प्रीस्टाईन संघाचा 24-05 असा एकतर्फी विजय मिळवला. विजयी संघाकडून अमित नाटेकर, राहुल मुथा, सारंग पाबळकर, ध्रुव मेड, नरहर गर्गे, रोहन दळवी, सारंग देवी, अमोघ बेहरे यांनी अफलातून कामगिरी बजावली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
डेक्कन ऍव्हेंजर्स वि.वि.टेनिस द मिनास 18-17(100 अधिक गट: आनंद कोटस्थाने/सुरेश घुले पराभूत वि.राजीव पागे/पराग चोप्रा 2-6; 90 अधिक गट: केतन जाधव/अभिजीत मराठे वि.वि.अमित महाजनी/संग्राम पाटील 6-2; खुला गट: गोपीनाथ/आनंद कोटस्थाने पराभूत वि.अभिजीत शहा/सचिन पुरोहित 4-6; खुला गट: मंगेश प्रभुदेसाई/शंतनू शौरी वि.वि.अजिंक्य मुठे/अभिजीत खानविलकर 6-3);
लायन्स वि.वि.मॉँट व्हर्ट प्रीस्टाईन 24-05(100अधिक गट: अमित नाटेकर/राहुल मुथा वि.वि.विकास/सूरज झंझोटे 6-0; 90 अधिक गट: सारंग पाबळकर/ध्रुव मेड वि.वि.संजीव/सचिन बी. 6-3; खुला गट: नरहर गर्गे/रोहन दळवी वि.वि.विकास/धैर्यशील गोहिल 6-0; खुला गट: सारंग देवी/अमोघ बेहरे वि.वि.सुयश/नरेश 6-2);