मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

Date:

मुंबई-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. गुप्तचर विभागाला याबाबत माहिती मिळाल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. एकनाथ शिंदे यांना एका महिन्यापूर्वी धमकीचं फोन आणि धमकीचं पत्र आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. धमकीसंदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्फोट उडवून जिवे मारण्याची धमकी आल्याचं समोर आलं होतं. एकनाथ शिंदे यांनी यावर बोलताना, मला असे अनेक फोन आले आहेत. माझ्यावर धमक्यांचा परिणाम होत नाही. मी शेवटी जनतेमधला माणूस असून जनतेत जाण्यापासून मला कोणीही रोखवू शकत नाही. पोलिस, गृहविभाग योग्य ती खबरदारी घेत आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. असे कुणाला वाटले तरी कुणीही काही करू शकत नाही असे धाडस देखील त्यांनी करण्याचा प्रयत्न करू नये. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिंदेंना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याचीही माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर एक निनावी फोन देखील धमकीचा आला होता. पोलिस सतर्क झाले असून या संबंधी तपास सुरू आहे. यापूर्वी नगरविकास मंत्री असताना माओवाद्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नव्या वाटांचा शोध आणि प्रवास हवाहवासा : गुरू ठाकूर 

साहित्यदीप काव्य महोत्सवात कलादीप पुरस्काराने गुरू ठाकूर यांचा गौरव पुणे...

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री : ६ मिनिटांचा सोहळा; शरद पवारांची अनुपस्थिती

मुंबई-अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या...

मुळा–मुठा नदीतील प्रदूषण ही गंभीर समस्या-केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरी

‘नमामी गंगा’ चळवळीप्रमाणे ‘नमामी मुळा–मुठा’ अशी योजना आणणार लोणी–काळभोर...