गांधी भवनच्या रोझा इफ्तार मध्ये एकात्मतेचे दर्शन

Date:

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित रोजा इफ्तारला प्रतिसाद
पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित रोजा इफ्तार कार्यक्रमाला गुरूवारी सर्वधर्मीय बांधवांनी उपस्थित राहून एकात्मता, बंधू भावाचे दर्शन घडवले.रोजा इफ्तार कार्यक्रमाचे हे  चौथे वर्ष होते.
  महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी, सचिव अन्वर राजन,युवक क्रांती दलाचे संदीप बर्वे यांनी स्वागत केले. हा कार्यक्रम गुरुवार दिनांक २१ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गांधी भवन, कोथरूड येथे पार पडला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील , सर्व धर्मिय मान्यवर उपस्थित राहिले. त्यामध्ये माहेर संस्थेच्या ल्यूसी क्युरीयन, स्नेहसदन चे फादर रॉबर्ट, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर  मोळक, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे , अरुण खोरे तसेच निकोल पवार( सचिव, माहेर संस्था ) , लक्ष्मीताई दुधाणे (राष्ट्रवादी काँग्रेस) ,  सोनाली मारणे  सचिव काँग्रेस पक्ष , असलम बागवान, युनुस भाई तांबटकर, अंजुम इनामदार, अॅड. मंजुषा नयन – आम आदमी पार्टी, शंकर केमसे, मोहनराव मते, अनीस अहमद – समाजवादी पक्ष ,मुख्तार मणियार, नुरु पटेल, नवाझ खान, जमीर पटेल, असरार खान उपस्थित राहिले.
इम्तियाज शेख यांनी सर्व मान्यवरांना कुराणाची प्रत भेट दिली.
संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, अप्पा अनारसे, विजय बोडेकर, सचिन पांडुळे, प्रसन्न मराठे, नीलम पंडित, कमलाकर शेटे, सुदर्शन चखाले, रोहन गायकवाड, अजय नेमाणे, शाम तोडकर, विवेक काशीकर, रेश्मा सांबरे, प्रसाद झावरे, डॉ. प्रवीण सप्तर्षी, आदित्य आरेकर, अभिजीत मंगल, आवेद सय्यद यांनी संयोजन केले.

कार्यक्रमामागची भूमिका
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गांधी भवन मध्ये रोजा इफ्तार कार्यक्रम आयोजित करण्यात आला . हिंदू- मुस्लिम ऐक्य, सर्वांना रोजगार आणि जातीनिर्मूलन हे गांधीजींनी सांगितलेले भारतीय राष्ट्रवादाचे तीन आधार आहेत. एकमेकांच्या धर्माचा आदर करणे आणि एकमेकांच्या सण उत्सवात आनंदाने सहभागी होणे, हे भारतीय धर्मनिरपेक्षतेचे आहे. दिवाळी, रमजान त्यासंदर्भातले तीन प्रमुख सण आहेत, ज्यात प्रत्येक भारतीयाने सहभाग घेतला पाहीजे. राष्ट्राची एकता नाताळ हे आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधूता निर्माण करण्याचा संकल्प भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये नमूद करण्यात आला आहे. त्या संकल्पाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या रोजा इफ्तार कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे विविध मान्यवर सहभागी झाले. या कार्यक्रमात रोजा म्हणजे दिवसभराचा उपवास सोडण्यासाठी मुस्लिम बंधू-भगिनी गांधी भवनमध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता आले.  आज देशामध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य तोडण्यासाठी काही राजकीय शक्ती अफवा, गैरसमज आणि असत्य पसरवत आहेत. त्याला बळी पडलेले लोक ठिकठिकाणी हिंसाचार करीत आहेत. या गंभीर  वास्तवाचे भान ठेवून आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेचे मुल्य बळकट करायचे आहे. म्हणून अधिक उत्साह आणि जोमाने या कार्यक्रमात  सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल ने केले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...