पुणे-दलित पॅन्थरच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला . पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास प्रारंभ करण्यात आला . या मोर्चामध्ये दलित पॅन्थरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे , पुणे शहरअध्यक्ष प्रकाश साळवे , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजू तळेकरी , महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा मीनल पंजवानी , महिला पुणे शहर अध्यक्षा आरती बाराथे , पुणे शहर जिल्हा युवा अध्यक्ष विक्रम कांबळे , महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष शुभम सोनवणे, महाराष्ट्र प्रदेश माथाडी अध्यक्ष हुसेन शेख , राहुल सोनवणे , विशाल खिलारे , सतीश बनसोडे , पप्पू मोरे , विलास गायकवाड , बबलू बोर्डे , संगीता धिवरे , विशाल जौंजाळे , बायडाबाई खरसडे , अल्फाना गोटे आदी पँथर्स या मोर्च्यामध्ये सहभागी झाले होते
निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे याना निवेदन देण्यात आले . या निवेदनामध्ये महारवतन इनाम वर्ग ६ चा जमिनी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात आल्या ते प्रथम थांबवा , खराडी गाव येथील जागेचा प्रश्न सोडवा , पी एम सी कॉलनी क्र ६ राजेंद्र नगर येथील झोपडपट्टीचा प्रश्न त्वरित सोडविण्यात यावा व झोपडपट्टी धारकांना एस. आर ए प्रकल्प त्वरित राबवावा , सुक्षिशित बेकार तरुणांना शासनाच्यावतीने मासिक बेकार भत्ता ६००० रुपये देण्यात यावं , मागासवर्गीय महामंडळे व बँक सुक्षिशित तरुणांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज देण्यासाठी भांडवल व्यवस्था करण्यात यावी . जात प्रमाणात ५० वर्षाचा पुरावा मागितला जातो हि जाचक आत रद्द करण्यात यावी जात पडताळणी प्रमाणपत्र त्वरित देण्याची व्यवस्था करण्यात यावी . अशा मागण्या निवेदनात देण्यात आल्या .

