पुणे- पीएमपीएमएल कडून नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या योजनेत एका मनपा हद्दित दैनिक पास रूपये ४० व मासिक पास रूपये ९०० ,दोन्ही मनपा हद्दित दैनिक पास रूपये ५० व मासिक पास रूपये १२०० रुपये प्रमाणे देण्याचा निर्णय संमत करण्यात आला आहे.
पीएमपीएमएलच्या संचालक मंडळ यांचे ठरावान्वये व अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे मान्यतेनुसार परिवहन महामंडळाच्या बस संचलनातील एका मनपा हद्दीत प्रवास करणेकरीता दैनिक पास रूपये ४०/-व मासिक पास रूपये९००/- व दोन्ही मनपा हद्दीत प्रवास करणेकरीता दैनिक पास रूपये ५०/- व मासिक पास रूपये १२००/- अशी नव्याने बस प्रवास पासेसची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. सदरचे दैनिक पासेस हे वाहक सेवक मार्गावर कर्तव्यास असताना त्यांचे ई
तिकिट मशिनमधून प्रवाशांना वितरीत करतेवेळेस कोणत्या प्रकारचा पास हवा याची खात्री करूनच पुर्वीच्या कार्यपद्धतीनुसार दैनिक पासेस वितरीत करण्यात येणार आहेत. तसेच, सध्या चलनात असलेले दैनिक पास रूपये ७०/- व जेष्ठ नागरीक दैनिक पास रूपये ४०/- या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ते संपल्यानंतर नवीन दराने नवीन पासेस देण्यात येतील
तसेच, एका मनपा हद्दीतील मासिक पास रूपये ९००/- व दोन्ही मनपा हद्दीतील मासिक पास रूपये १२००/- हेपासेस प्रवाशांना पास केंद्रावर उपलब्ध होतील. अध्यक्ष, प्रादेशिक परिवहन
प्राधिकरण, पुणे यांचे मान्यतेस अधिन राहून दि.०७/१०/२०२१ पासून या प्रमाणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.असे पीएमपीएमएल ने कळविले आहे
पीएमपीएमएल बसचा दैनिक पास ४०ते ५० रुपये,मासिक पास ९०० ते १२०० रुपये
Date:

