दादासाहेब फाळके चित्रनगरीचा पुर्नविकास करण्यात येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

Date:

मुंबई, दि.७: दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात फिल्मसिटी येथे सध्या अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांचे चित्रीकरण मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळेच लवकरच अत्याधुनिक आणि चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधांचा अभ्यास करुन फिल्मसिटीचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्मसिटी) संदर्भात  बैठक झाली. या बैठकीला चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा, सल्लागार अजय सक्सेना, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानीबरोबरच सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. आज मनोरंजन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारले असून फिल्मसिटीमध्ये दरदिवशी वेगवेगळ्या माध्यमांसाठी चित्रीकरण होत असते. या माध्यमांची आवश्यकता लक्षात घेऊन पुर्नविकास याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. सध्या आपण सर्वच कोविडशी मुकाबला करीत आहोत. येणाऱ्या काळात सांस्कृतिक क्षेत्राचा विस्तार करीत असताना प्राधान्याने फिल्मसिटीचा पुर्नविकास करणे गरजेचे आहे. नव्याने करण्यात येणारा पुनर्विकास कसा असेल, त्याचे टप्पे कसे असतील, पुनर्विकास करीत असताना कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जाणार आहेत, पुनर्विकासाचा टप्पा किती वर्षांचा असेल अशा सर्व बाबींवर चर्चा यावेळी करण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड

पुणे, दि. 4 मार्च: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे...

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. ४ मार्च २०२६.राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत...

श्री रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९वे वार्षिक रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

पुणे- आर. एम. धारीवाल फाउंडेशन तर्फे समाजसेवेची अखंड परंपरा...

मुळा-मुठा नदी प्रदूषणाविरोधात ‘एमआयटी’च्या विद्यार्थ्यांचा एल्गार

नदीपात्रात अवैध कचरा टाकण्याविरोधात विद्यापीठ प्रवेशद्वारावर आंदोलन; आगी व...