संध्याकाळी गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत पोहचण्याची शक्यता
मुंबई-हवामान विभागाच्या ताज्या माहितीप्रमाणे तौते चक्रीवादळ मुंबईपासून १७० किमी अंतरावर आहे.संध्याकाळी गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे, हे वादळ हळूहळू पुढे सरकत असून, याचा प्रभाव मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, जळगाव यासह इतरही काही जिल्ह्यात दिसून आला आहे. रविवारी सायंकाळपासून मुंबईत पावसाला सुरूवात झाली. तर पुणे, सातारा आणि जळगाव जिल्ह्यात वादळाचा तडाखा बसला.

तौक्तेचे केंद्र मुंबईपासून सुमारे १७० किमी समुद्रात आहे. त्याच्या प्रभावामुळे – वादळी वारे, समुद्राच्या उंच लाटा उसळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे .रात्री १२ च्या सुमारास अतितीव्र तौक्ते चक्रीवादळाचे केंद्र श्रीवर्धन पासून दीडशे किमी पश्चिमेला होते.अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर तोक्ते चक्रीवादळात झालं असून अतिशय रौद्र रुप धारण करत हे वादळ आता मुंबईनजीक येऊन पेहोचलं आहे. रविवारपर्यंत गोवा, रत्नागिरी आणि उर्वरित कोकण किनारपट्टीवर धुमाकूळ घातलेलं हे वादळ आता काहीसं पुढे सरकलं असून, सध्याच्या घडीला त्याचं केंद्र हे मुंबईच्या समुद्रसपाटीपासून 150 किमी समुद्री भागात असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई ला हे वादळ थेट धडकणार नसलं तरीही त्याचे थेट परिणाम मात्र शहरात दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. सध्याच्या घडीला मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोसाट्याचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे, तर काही भागांत मुसळधार ते मध्यम स्वरुपाच्या पावसालाही सुरुवात झाली आहे. पुढील चार – पाच तास मुंबईत अशीच परिस्थिती कायम राहणार असून, दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तोक्ते चक्रीवादळ मुंबईपासून पुढे उत्तरेकडे सरकणार आहे. पुढे गुजरात दिशेनं या वादळाचे परिणाम दिसण्यास सुरुवात होणार आहे.तौते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, अहमदनगर, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये प्रतितास ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असून, जिल्ह्यांमधील काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रतितास ७५ ते ८५ किमी वेगाने वारे वाहणार असून, वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
वादळी वारा तसेच पावसामुळे पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागांत ४० ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. काही ठिकाणी वाहनांवर झाडे कोसळल्याने वाहनांचे नुकसान झाले. दरम्यान पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार शहरात आजही ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून हलक्या पावसाची शक्यता आहे.शहरात वादळी वारे वाहत असल्याने झाडाखाली शक्यतो थांबू नये. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे, असे आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात आले.

