पुणे- पद्मावती येथील महापालिकेच्या ख्यातनाम अशा पोटे दवाखान्यात आता शासकीय अल्पदरात होणार सिटीस्कॅन हि डाग्यनोस्टिक सुविधा उपलब्ध होणार असून माझ्या बजेटमधून पुणे मनपा अर्थसंकल्पात २ कोटी २0 लाख रुपयांची भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
त्यांनी असेही म्हटले आहे कि,’मेडिकल अभ्यासाप्रमाणे कोरोनाचे निदान होण्यासाठी सीटी स्कॅन मधील CT SCAN HRCT THORAX ही टेस्ट महत्त्वाची ठरत आहे. आणि गेल्या वर्षापासून या टेस्टचे खाजगी सेंटरर्समध्ये ५-७ हजार रूपये आकारले जात असताना महाराष्ट्र शासनाने या टेस्टची अधिकृत किंमत अडीच हजार रूपये जरी केले असले तरी त्याकरीता ही टेस्ट करून घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते,टेस्ट कुठे करायची, करायची तर तासं-तास तातकळत बसणे आणि टेस्ट केल्यावर २४ तासांनी रिपोर्ट मिळणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.या सर्वांचा विचार करून माझ्या बजेटमधून २०२१-२२ च्या पुणे मनपाच्या अर्थसंकल्पात कै.पोटे दवाखान्यात सीटी स्कॅन सुरु करण्याकरीता २ कोटी २० लाख रुपयांची भरीव तरतूद करून घेतली आहे.कोरोनाच्या विरुद्ध लढा देत असताना लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना पुणे मनपाच्या माध्यमातून उपयोगी व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि येणाऱ्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये लवकरच सीटी स्कॅन ही डाग्यनोस्टिक सुविधा अल्पदरात सुरु करणार.असे अशीविनी कदम यांनी म्हटले आहे.