पुणे – महापालिका अग्निशामक दलाच्या शिडीचा वापर हा केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याकरता न करता प्रामुख्याने त्या निमित्ताने तो मंत्र्यांचे अभिनंदन करण्यासाठी वापरल्याने पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ सोशल मिडीयावर टीकेचे धनी बनू लागले आहेत , तर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना तुळशीबागेत तिरंगा रैली ची बातमी जाहिरात स्वरूपात प्रसिद्ध करावी लागल्याने संबधित माजी पदाधिकारींच्या पाच वर्षातील कारकिर्दीकडे असेच जाहिरात स्वरूपात पाहिले जात ते टीकेचे धनी बनले आहे. आप च्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराकडे लक्ष वेधले आहे.. तर भाजपचे कोथरूड चे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला मात्र यास गालबोट लावण्याचे कृत्य माजी महापौरांनी केल्याचा आरोप देखील येथे आप च्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मंत्रीपदी पुन्हा नियुक्ती झाल्याने स्वागत अभिनंदन करण्यास हरकत कोणाचीच नाही पण हे सारे करताना थोडेसे भान राखायला हवे होते अडीच तीन वर्षे महापालिकेत सत्ता भोगलेल्या पदाधिकाऱ्यांनी अजूनही असेच वागणे शोभनीय आहे काय असा सवाल आप ने विचारला आहे.
दरम्यान कोथरूड मधील मंत्री पाटलांच्या स्वागतासाठी वापरलेल्या शिडीचा फोटो सोशल मिडिया वर शेअर करत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी देखील प्रश्न उपस्थित करत उत्तर द्या म्हटले आहे . त्यांनी या पोस्त वर असे म्हटले आहे कि,’महापालिकेची मालमत्ता भाजपाची खाजगी इस्टेट आहे का? अग्निशमनदलाची शिडी कोणत्या अधिकारात वापरली? असा वापर कायदेशीर आहे का? अग्निशमन दलाची यंत्रणा यासाठी आहे का? हा मुद्दा सतीश यादव यांनी उपस्थित केला आहे उत्तर द्या
