पुणे- एक दिवसीय मालिकेच्या दुसर्या लढतीत टीम इंडियाने न्यूझिलंडवर 6 विकेट आणि 24 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.
कीवी टीमने प्रथम फलंदाजी करत निर्धारित 50 षटकांत 9 विकेट गमावून 230 धावा केल्या होत्या. विजयासाठी 231 धावांचे लक्ष्य स्विकारून मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने 46 षटकांत 4 विकेट गमावून 232 धावा केल्या.
मालिकेतील तिसरा व अंतिम सामना 29 ऑक्टोबरला कानपूर येथील मैदानावर खेळण्यात येणार आहे.
न्यूझीलंडच्या 231 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने फलंदाजीला धडाकेबाज सुरुवात केली. भारताकडून शिखर धवन आणि रोहित शर्मा ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरले होते. मात्र, रोहित शर्मा 7 धावांवर बाद झाला. तर विराट कोहली 29 धावांवर तंबूत परतला. भारताने 24 ओव्हरमध्ये 2 गडी गमावून 124 धावा केल्या आहेत.